Rashmi Barve Ramtek : बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द, काँग्रेसचा दुसरा उमेदवार कोण?
Setback for Congress on Ramtek LS seat : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द
उच्च न्यायालयात आव्हान देणार
रामटेकमधून काँग्रेसचा दुसरा उमेदवार कोण?
Ramtek lok Sabha elections 2024 updates : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे या जात वैधता प्रमाणपत्रामुळे अडचणीत आल्या आहेत. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द केल्याने आता काँग्रेससमोर पर्याय काय आणि रामटेकमध्ये काय होणार, हे प्रश्न उपस्थित होताहेत. (Congress candidate Rashmi Barve's caste validity certificate has been cancelled by regional caste scrutiny committee)
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीमध्ये रामटेक हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली. मात्र, जात प्रमाणपत्रामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
हेही वाचा >> "नवनीत राणा 'मौत का कुआं'मध्ये गेल्यात", शिंदेंचा नेता स्पष्टच बोलला
हेही वाचा >> बारामतीसाठी अजित पवारांचा विजय शिवतारेंसोबत 'तह'
गुरुवारी (28 मार्च) विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले. हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. रश्मी बर्वे यांनी या प्रकरणात आधीच न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयावर बर्वे यांचं भवितव्य अवलंबून आहे.
हे वाचलं का?
काँग्रेसने आधीच घेतली खबरदारी
रश्मी बर्वे यांना रामटेकमधून उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला होता. त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात तक्रार करण्यात आली. जात पडताळणी समितीने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेनंतर निकाल दिल्यास काँग्रेसला दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला असता. त्यामुळे काँग्रेसने ही अडचण ओळखून आधीच पर्यायी उमेदवारही दिला होता.
रामटेकमधून शामकुमार बर्वे?
जात प्रमाणपत्रामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला, तर काँग्रेसचे उमेदवार शामकुमार बर्वे हे असतील. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच शामकुमार बर्वे यांचे नाव दुसरा उमेदवार म्हणून आधीच दिलेले आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार इथे असणार आहे. पण, जात पडताळणी समितीच्या निर्णयाला रश्मी बर्वे न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT