Amravati Lok Sabha : "नवनीत राणा 'मौत का कुआं'मध्ये गेल्यात", शिंदेंचा नेता स्पष्टच बोलला
Navneet rana anandrao adsul : नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेना, बच्चू कडू यांच्यासह भाजपमध्येही नाराजी आहे.
ADVERTISEMENT
Navneet rana anandrao adsul : नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेना, बच्चू कडू यांच्यासह भाजपमध्येही नाराजी आहे.
Anandrao Adsul Navneet Rana Amravati Lok Sabha Elections 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेकडील आणखी एक जागा भाजपने स्वतःच्या झोळीत पाडून घेतली आहे. असं असलं तरी या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आणि बच्चू कडू यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांचा राणा यांना विरोध आहे. अमरावतीतील परिस्थितीबद्दल शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अडसूळ यांनी मोठे विधान केले आहे. ()
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळावर मुंबई Takशी बोलताना माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, "नवनीत राणा मौत का कुआं असतो ना त्यात गेल्या आहेत", असे आनंदराव अडसूळ म्हणाले. त्यावर पत्रकारांनी विचारले की असं का म्हणताय? त्यावर अडसूळ म्हणाले, "त्यांना सगळ्यांचा विरोध आहे. त्यांची केस पुढे जाणार आहे. मग, निवडणूक कशी लढणार आहेत?"
हेही वाचा >> भाजपला 28 जागा, राष्ट्रवादीला 5; तर शिंदेंच्या शिवसेनेला...; काय ठरला फॉर्म्युला?
नवनीत राणा जिंकून येतील का? असा प्रश्न अडसूळ यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, "कशी जिंकणार? सगळ्यांचा विरोध आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा (भाजप) विरोध आहे. त्यांची उमेदवारी महायुतीने नाही ठरवलेली. अशा पद्धतीने सगळ्या पक्षांनी किती तिकिटं जाहीर केली आहेत."
हे वाचलं का?
राणा स्वतः निर्णय घेऊ शकत नाही -अडसूळ
नवनीत राणांचा निर्णय चुकला आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? या प्रश्नावर आनंदराव अडसूळ म्हणाले, त्यांचा काय, त्यांच्यावर लादला आहे. त्या स्वतः निर्णय घेऊ शकतात का? लादला आहे."
हेही वाचा >> बारामतीसाठी अजित पवारांचा विजय शिवतारेंसोबत 'तह'
अमरावतीतून महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे. तुम्ही मौत का कुआं म्हणत आहात? "तिथली परिस्थिती तुम्हाला माहितीये का? सगळी जनता विरोधात आहे. भाजपचेच लोक त्यांच्याविरोधात आहेत. बाकी सोडून द्या. त्यात विचारपूर्वक काहीच नाहीये. प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, बाकी काही नाही. वरच्यांच्या प्रतिष्ठेचा", असे अडसूळ यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT