लेकाची वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी, पैसे देण्यास नकार, लोखंडी रॉडने जन्मदात्याचा केला खून... नागपूर हादरलं

मुंबई तक

Nagpur crime : नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लेकानेच आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात रॉडने हल्ला करत जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

ADVERTISEMENT

nagpur crime
nagpur crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये प्रकार उघडकीस

point

आरोपीकडून वडिलांना शिवीगाळ आणि नंतर खूनाचा गुन्हा 

point

लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला

Nagpur Crime : नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लेकानेच आपल्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात रॉडने हल्ला करत जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलगा हा कुख्यात गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा एकूण थरार हा पारडी पोलीस ठाणे परिसरातील भांडेवाडीतील हनुमाननगर परिसरात घडला. नारायण आरमारीकर (वय 52) असे आरोपी मुलाचे नाव आहे. 

हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं, बारमध्ये वेटरसोबत वाद झाला अन् चौघांनी मिळून बँक व्यवस्थापकाला धारदार शस्त्रांनी संपवलं

आरोपीकडून वडिलांना शिवीगाळ आणि नंतर खूनाचा गुन्हा 

पवन हा बहीण व आईसह राहायचा तर घरातील एका खोलीत नारायण राहायचे. मानसिक संतुलन बिघडल्याने तो नेहमीच शिवीगाळ करायचा. दारूला पैसे नसल्याने तो नेहमी वडिलांकडे पैशांची मागणी करायचा. त्याने पवनकडे पैशांची मागणी केली असता, पवनने पैसे देण्यास नकार दिला आणि नारायणने पवनला शिवीगाळ केली. सतत शिवीगाळ होत असल्याने पवन संतापला, तेव्हा नारायण हा घराबाहेर उभे होते. 

लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला 

यादरम्यान, पवनने घरातून लोखंडी रॉड आणला आणि नारायण यांच्यावर प्रहार केला. पवनने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने पवनला शिवीगाळ संताप व्यक्त केला. तेव्हा नारायण हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याचे सांगितले. पवनने थेट पारडी पोलीस ठाणे गाठत स्वत: सरेंडर झाला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी घटनेची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी भांडेवाडी गाठून पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत पनवला अटक केली आहे. 

हे ही वाचा : बाईक टॅक्सी चालकाने तरुणीला आधी धमकावले, नंतर तिच्यावर लैंगिक शोषण करत... नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून मिळालेल्या एकूण माहितीनुसार, पवन हा गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्लासह सहा गुन्हे असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी तो एका प्रकरणातून कारागृहातून बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp