बाईक टॅक्सी चालकाने तरुणीला आधी धमकावले, नंतर तिच्यावर लैंगिक शोषण करत... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Sexully Assault : बाईक टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या एका पुरुषाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल अटक केली, नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

Sexully Assault
Sexully Assault
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाईक टॅक्सी चालकाकडून महिलेवर लैंगिक

point

तपासानंतर आरोपीला अटक

point

नेमकं काय घडलं?

Sexully Assault : बाईक टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या एका पुरुषाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल अटक केली. तरुणाचे नाव शिवकुमार (वय 22) असे नाव आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिवकुमारची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. घटनेनुसार, महिलेने सोमवारी रात्री उशिरा चेन्नईच्या पक्कीकरणई येथे तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बाईक टॅक्स बुक केली. तिने ज्या चालकाला निवडले होते, त्याला परत येईपर्यंत वाट पाहण्यास सांगितली. 

हे ही वाचा : शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महामार्ग रोखले, आंदोलकांकडून भारत बंदचा इशारा, नेमक्या काय आहेत मागण्या?

पीडितेला धमकावले आणि लैंगिक अत्याचार 

मंगळवारी सकाळी तिला घरी सोडताना, शिवकुमारने पीडित तरुणीला धमकावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. नंतर ड्रायव्हरने पीडितेला तिच्या घरी सोडलं आणि तिने हा घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितली. 

तपासानंतर आरोपीला अटक

तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीची ओळख शिवकुमार म्हणून झाली असल्याचे पोलिसांनी त्यांच्या निवेदनातून सांगितलं आहे.

हे ही वाचा : अर्धकेंद्र योगाने 'या' राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळून यश संपादन होईल, काय सांगतं राशीभविष्य?

तामिळनाडूतील विरोधी पक्ष महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करू लागले आहेत. केवळ दक्षिण भारतातच नाही,तर देशभारत अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp