शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महामार्ग रोखले, आंदोलकांकडून भारत बंदचा इशारा, नेमक्या काय आहेत मागण्या?

मुंबई तक

Bacchu kadu protest : शेतकऱ्यांच्या मागणी आणि हक्कासाठी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे मंगळवारी रात्री हजारो शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढत नागपूरच्या सीमेवर पोहोचले आहेत.

ADVERTISEMENT

Bacchu kadu protest
Bacchu kadu protest
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडूंचे आंदोलन

point

नागपूर-हैदराबाद महामार्ग पूर्णपणे जाम

point

सरकारला दिला अल्टिमेट

Bacchu Kadu Protest : शेतकऱ्यांच्या मागणी आणि हक्कासाठी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे मंगळवारी रात्री हजारो शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढत नागपूरच्या सीमेवर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणी आणि हक्कासाठी बच्चू कडूं यांच्या नेतृत्त्वात महाएल्गार मोर्चा काढला. आंदोलन करत त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांसोबत नागपूराच पोहोचले. 

हे ही वाचा : मुंबईतील इनकम टॅक्स अधिकाऱ्याला तब्बल 44 लाख रुपयांना गंडा... मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली अन् जाळ्यात अडकला

शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय? 

बच्चू कडूंची प्रमुख मागणी अशी की, राज्यात झालेल्या मराठवाड्यातील ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईवर मागणी करण्यात आली. राज्यातील दिव्यांग असलेल्या नागरिकांना 6 हजार प्रतिमाह आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांच्या पिकांना हामीभावाची मागणी करत आंदोलन सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नागपूर-हैदराबाद महामार्ग पूर्णपणे जाम

29 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस आणि बच्चू कडूंचे कार्यकर्ते सकाळी आक्रमक दिसून आले. कार्यकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग पूर्णपणे जाम करण्यात आला होता. तब्बल 25 किमी अंतरापर्यंत ट्राफीकची स्थिती निर्माण झाली. ट्राक, कार, दोपहिया वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. याव्यतिरिक्त कार्यकर्त्यांनी काही काही छोटे रस्ते जाम करून ठेवलेत. 

हे ही वाचा : दोघांनी ट्रेनसमोर उडी मारली अन्... रेल्वे रूळावर पीडितेचा नग्न अवस्थेत सापडला मृतदेह! लव्ह स्टोरीचा ‘असा’ झाला दि एण्ड..

बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अल्टीमेट दिला होता आणि सांगितले की, त्यांनी मागण्या मान्य न केल्यास ट्रेन आणि भारत बंद करू. यादरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा राखण्यात आलेला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp