मुंबईतील इनकम टॅक्स अधिकाऱ्याला तब्बल 44 लाख रुपयांना गंडा... मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली अन् जाळ्यात अडकला
एका 29 वर्षीय इनकम टॅक्स अधिकाऱ्याने नेरुळ पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध सुमारे 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इनकम टॅक्स अधिकाऱ्याला तब्बल 44 लाख रुपयांना गंडा...
मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली अन् जाळ्यात अडकला
मुंबईतील आयकर अधिकाऱ्यासोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime: एका 29 वर्षीय इनकम टॅक्स अधिकाऱ्याने नेरुळ पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध सुमारे 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस आता सायबर एक्सपर्ट्ससोबत काम करत असल्याची माहिती आहे. पीडित तरुणाची एका मॅट्रिमोनियल साईटवर आरोपीशी ओळख झाली. आरोपी महिलेने पीडित अधिकाऱ्याला लग्नाचं आश्वासन देऊन त्याची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं की, त्याने एका मॅट्रिमोनियल साईटवर त्याची प्रोफाइल तयार केली होती. त्यानंतर त्याने दिव्या सरकार नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने 17 ऑगस्ट रोजी त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि त्यांनंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालं.
लग्न करण्याचं आश्वासन दिलं अन्...
दरम्यान, दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले. आरोपी महिलेच्या नंबरच्या पुढे UK कोड लावला. संबंधित महिला मध्य प्रदेशातील जबलपूरची असून ती लंडनमध्ये काम करत असल्याचं तिने सांगितलं. तिने तिचा बायोडाटा पीडित तरुणाला पाठवला. त्यावेळी तिने सांगितलं की तिच्या आईवडिलांचं निधन झालं असून ती पुढच्या आठवड्यात भारतात येणार आहे. तिच्या आईवडिलांची शेवटची इच्छा होती की तिने लग्न करून भारतात स्थायिक व्हावे, त्यामुळे ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी परत येत असल्याचं देखील तिने सांगितलं.
हे ही वाचा: दोघांनी ट्रेनसमोर उडी मारली अन्... रेल्वे रूळावर पीडितेचा नग्न अवस्थेत सापडला मृतदेह! लव्ह स्टोरीचा ‘असा’ झाला दि एण्ड..
वेगवेगळ्या बहाण्याने पैसे ट्रान्सफर करून घेतले
18 सप्टेंबर रोजी, त्या महिलेने ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटच्या तिकिटाचा स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यामध्ये ती भारतात येत असल्याचं तिने सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी, त्या तरुणाला एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख सुजाता धर अशी करून दिली असून, ती एअरपोर्टवरील अधिकारी असल्याचं तिने सांगितलं. त्या महिलेने पीडित तरुणाला सांगितलं की तिला दिव्याकडून 50,000 पाउंडचा अनरजिस्टर्ड म्हणजेच नोंदणी नसलेला डिमांड ड्राफ्ट मिळाला होता आणि त्यासाठी 1 लाख रुपये आवश्यक होते. दिव्याने आधीच 40,100 रुपये दिले असून 59,900 रुपये अजूनही शिल्लक असल्याचं तिने सांगितलं. तिच्यावर विश्वास ठेवून, त्या तरुणाने सांगितलेल्या बँक खात्यात 55,000 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सुजाताने त्याला सांगितलं की दिव्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. मनी लाँडरिंग विरोधी प्रमाणपत्रासाठी तिला 99,70 रुपये जमा करावे लागतील, नाहीतर तिला एअरपोर्टवर ताब्यात घेतलं जाईल. यावर त्या तरुणाने सांगितलं की त्याच्याकडे पैसे नसून बँक सुद्धा बंद आहे. दिव्या म्हणाली की मध्य प्रदेशातील तिचे नातेवाईक सुद्धा बेपत्ता आहेत. त्यामुळे, त्या तरुणाने तिला आणखी 99,000 रुपये ट्रान्सफर केले.
हे ही वाचा: ठाणे: गर्लफ्रेंडसोबत झाला वाद, प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं.. कुटुंबीय घरी पोहोचले अन्...
सायबर फसवणूक झाल्याची जाणीव
थोड्या वेळानंतर, त्या तरुणाला दुसरा फोन आला, ज्यामध्ये त्याला भारतीय चलनात डिमांड ड्राफ्ट बदलण्यासाठी त्याच्या बँक खात्याची माहिती पाठवण्यास सांगितलं गेलं. त्या तरुणाने माहिती देण्यास नकार दिला आणि त्याला नवीन खाते उघडण्यास सांगितलं गेलं. त्या महिलेने त्याला नवीन बँक खाते उघडण्यासाठी 3.86 लाख रुपये जमा करण्यास सांगितलं. त्यानंतर त्या तरुणाने विश्वास ठेवून 1.86 लाख रुपये आणि 2 लाख रुपये अशा दोन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. 29 सप्टेंबर रोजी, सुजाताने पुन्हा त्याला फोन केला आणि वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी केली. 5 ऑक्टोबर रोजी, दिव्याने त्याला मॅसेज पाठवला की ती हॉटेलचे बिल आणि जेवणासाठी पैसे नाहीत आणि हॉटेल मॅनेजरने तिला जेवण देणं बंद केलं आहे. थोड्याच वेळात, तिने हॉटेल कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून 3.69 लाख रुपयांची मदत मागितली. त्यानंतर त्या तरुणाला आपली सायबर फसवणूक झाल्याची जाणीव झाली.










