ठाणे: गर्लफ्रेंडसोबत झाला वाद, प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं.. कुटुंबीय घरी पोहोचले अन्...

मुंबई तक

एका 17 वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत झालेल्या भांडणामुळे तिला जाळून टाकल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत पीडितेचं शरीर 80 टक्के भाजलं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं अन्...
प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडसोबत झालेल्या वादातून तरुणाचं भयंकर कृत्य

point

प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून जिवंत जाळलं..

point

ठाण्यातील धक्कादायक घटना

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात प्रियकर आणि प्रेयसीच्या वादातून धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका 17 वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत झालेल्या भांडणामुळे तिला जाळून टाकल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत पीडितेचं शरीर 80 टक्के भाजलं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात कापुरबावडी पोलिसांनी 17 वर्षीय आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

जिवंत सोडणार नसल्याची धमकी 

प्रकरणातील पीडिता ही कापुरबावडी पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तसेच, ती यापूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतील चेंबूर परिसरात राहत होती. तिथे राहत असताना तिची ओळख त्या परिसरात राहणाऱ्या आरोपी तरुणासोबत झाली. दरम्यान, त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी, पीडित तरुणी ही भाऊबीजेच्या दिवशी चेंबूरमध्ये गेली होती. त्यावेळी, तिचं तिच्या प्रियकरासोबत भांडण झालं आणि त्याने तरुणीला मारहाण सुद्धा केली. याबद्दल, तरुणीच्या घरच्यांना समजल्यानंतर कुटुंबीय मुलीच्या मदतीसाठी तिथे पोहोचले आणि त्यांनी आरोपी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, आरोपीने तिच्या प्रेयसीला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. या घटनेने प्रेयसी खूप घाबरली.

हे ही वाचा: सातारा : मोबाईलच्या अतिवापरावरून दिलेला सल्ला ठरला जीवघेणा; अल्पवयीन रूममेटने गळा आवळून केला खून

घरी एकटी असताना घरातून धूर... 

24 ऑक्टोबर रोजी, पीडिता ठाण्यातील तिच्या घरात एकटी असताना, अचानक घरातून धूर येऊ लागला. त्यावेळी, शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्या आईला याबाबत कळवलं. पीडितेच्या घरचे लोक घराजवळ पोहोचले आणि तेव्हा त्यांना त्यांच्या घरात आरोपी तरुण दिसला आणि मुलगी आगीने जळत असलेल्या अवस्थेत ओरडताना दिसली. त्यानंतर, कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं. त्यावेळी, तरुणीच्या घरच्यांनी आरोपीला या घटनेबाबत जाब विचारला असता तो तिथून पळून गेला. अखेर, पीडितेच्या आईने कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी तरुणाला त्यांच्या ताब्यात घेतलं.

हे ही वाचा: ऑनलाइन गेमचा नाद नडला, 32 वर्षीय तरुणाने बायको-पोरांचाही विचार न करता थेट...

आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) 2023 च्या कलम 109, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात झालेल्या वादामुळे ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या जबाबाच्या आधारे सत्य घटना उघडकीस येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp