ऑनलाइन गेमचा नाद नडला, 32 वर्षीय तरुणाने बायको-पोरांचाही विचार न करता थेट...

मुंबई तक

ऑनलाइन गेमचं लागलेल्या व्यसनापायी बार्शी तालुक्यातील एका 32 वर्षीय तरूणाने स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

32 year old youth ends his life due to online game addiction debt depression
ऑनलाइन गेमचा नाद नडला
social share
google news

गणेश जाधव, बार्शी: बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात मोबाइलवरील एका ऑनलाइन गेमच्या व्यसनाने एका तरुणाचा जीव घेतला आहे. 32 वर्षीय समाधान ननवरे हा एक कर्ता पुरुष, एक तरुण व्यावसायिक पण ‘चक्री गेम’च्या नादात त्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य सपवलं. सरकारने या गेमवर बंदी घातली असली, तरी नवे नाव व नवे नेटवर्क घेऊन पुन्हा हा गेम सुरू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, ननवरे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.

दीड वर्षांपासून व्यसन, लाखोंचा व्यवहार

समाधान ननवरे गेल्या सात वर्षांपासून बार्शीत ‘डायमंड सलून’ नावाने व्यवसाय करत होता. मात्र, मागील दीड वर्षांपासून त्याला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले होते. कधी लाख रुपये जिंकत, तर दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांचं नुकसान. अशा या चक्री फेऱ्यात तो अडकला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्र, नातेवाईक आणि खासगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतले होते. एवढंच नाही, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही कर्ज घेऊन त्याने गेममध्ये पैसे गुंतवले होते.

हे ही वाचा>> 'चल खोलीत...', तरूणी म्हणाली 'येत नाही..' चिडलेल्या बॉयफ्रेंडने केली भलतीच गोष्ट!

24 ऑक्टोबरच्या रात्री त्याने आई व बहिणींसोबत जेवण केले आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. पहाटे आई सीताबाई उठल्या असता, घरातील स्लॅबवरील लोखंडी हुकावर समाधानने गळफास घेतल्याचं त्यांना दिसून आलं. तात्काळ समाधानला खाली उतरवण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पतीने जीवन संपवलं, पत्नीचा आक्रोश

समाधानच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा अक्षरशः आधाराविना झाले आहेत. पत्नीने मुंबई तकशी बोलताना सांगितलं की, “माझ्या संसारात सगळं छान चाललं होतं, पण मागील दीड वर्षांपासून तो या गेमच्या नादी लागला. आम्ही समजावलं, पण तो ऐकायला तयार नव्हता. आज माझे आई-वडील नाहीत, भाऊ नाही. आता माझ्या मुलाला मी कसं वाढवू? जसं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तसं दुसऱ्या कोणाचं होऊ नये, हीच माझी प्रार्थना आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp