तरुणाने तिला खोलीत नेण्यासाठी आणला दबाव, तरुणीने नकार दिल्यानंतर... एकतर्फी प्रकरणातून तिच्यावर गोळीबार

मुंबई तक

crime news : एका तरुणाने एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, नेमकं काय घडलं त्याची एकूण माहिती वाचा.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार

point

नेमकं काय घडलं? 

Crime news : एका तरुणाने एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुण देंडाहुडा गावात कामावर  जात असताना ही घटना घडली. तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणी जखमी झाली असून तिला सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून महिलेनं त्या तरुणाशी बोलणं बंद केले होते. तिनं पुन्हा बोलावं अशी तरुणाची अपेक्षा होती, पण तिने बोलण्यास नकार दिल्याने तरुण संतापला. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील गुरुग्राममध्ये घडली.  गोळीबार केलेल्या तरुणाचे नाव विपिन (वय 33) असे आहे. 

हे ही वाचा : Satish Shah: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं निधन, अवघ्यांना हसवणारा 'तो' तारा निखळला!

नेमकं काय घडलं? 

संबंधित तरुण हा उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील गुरुग्राममध्ये उद्योग विहार येथील फेज 4 मध्ये एका खासगी कंपनीत काम करते. तरुणी ही दुंडाहेरा परिसरात भाड्याच्या घरात राहते. रुग्णालयात पोलिसांकडे दाखल करण्यात आल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं. गुरुवारी सकाळी 10 वाजता तरुणी ऑफिसला जाण्यासाठी तिच्या खोलीतून बाहेर पडली असता, तरुणीने विपिनला पाहिलं. 

आरोपीने तिला जबरदस्ती एका खोलीत घेऊन जाण्यास दबाव आणला अन्...

पीडिता तरुणीने तक्रारीत सांगितलं की, आरोपी विपिनने तिला जबरदस्ती एका खोलीत घेऊन जाण्यास दबाव आणला होता. तेव्हा तरुणीने त्याला विरोध केला असता, तिच्यावर गोळीबार करण्याची धमकी दिली. तरुणी खोलीत न गेल्याने शेवटी तरुणाने तिच्यावर गोळीबार केलाच. दरम्यान, सांगण्यात येत आहे की, तरुणी आणि आरोपी दोघेही मित्र होते. 

हे ही वाचा : जालना: सात ते आठ जणांकडून तरुणावर लोखंडी रॉडसह लाठी काठीने हल्ला, 'त्या' कारणावरून तरुणाला रात्रीच संपवलं

तरुणीने विपिनसोबत काही दिवसांपासून बोलणं टाळलं होतं. तेव्हा तरुणी नाराज झाली असता, आरोपीने विपिनने असे कृत्य केले. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यांत पावरलेले पिस्तुलही जप्त केले. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp