जालना: सात ते आठ जणांकडून तरुणावर लोखंडी रॉडसह लाठी काठीने हल्ला, 'त्या' कारणावरून तरुणाला रात्रीच संपवलं
Jalna crime : जालन्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाला सात ते आठ जणांनी मध्यरात्री लाठी काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालन्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक
लाठी काठीसह लोखंडी रॉडने मारहाण
त्या रात्री नेमकं काय घडलं?
Jalna Crime : जालन्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाला सात ते आठ जणांनी मध्यरात्री लाठी काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका जुन्या वादातूनतच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत तरुणाचे नाव विकास लोंढे (वय 25) असे आहे. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनं जालना पुरतं हादरून गेलं आहे.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेपासून मंगळाचा महागोचर योग, 'या' राशींचे कसे असेल नशीब?
'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
मारहाणीनंतर तरुणाला एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला सकाळी उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं जालना शहरात एकच खळबळ माजली आहे. या मध्यरात्री घडलेल्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात सात ते आठ आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा वाद जुना असून याच वादातून हत्या करण्यात आली आहे.
या झालेल्या अचानकपणे हल्ल्यात सुरुवातीला विकासला जबर मार लागला होता. स्थानिकांनी त्याला मदत करत तात्काळपणे संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी विकासने पोलिसांसमोर काही आरोपींची नावे घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. पोलिसांनी या नावे नोंदवून तपास सुरु केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून हा वाद जुना असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : नांदेडच्या तरुणाचा कर्नाटकात खून, विवाहितेसोबत प्रेमसंबंध, महिलेच्या नातेवाईकांकडून अमानुष मारहाण, चटके देऊन संपवलं










