नांदेडच्या तरुणाचा कर्नाटकात खून, विवाहितेसोबत प्रेमसंबंध, महिलेच्या नातेवाईकांकडून अमानुष मारहाण, चटके देऊन संपवलं

मुंबई तक

Nanded Crime News : नांदेडच्या तरुणाचा कर्नाटकात खून, विवाहितेसोबत प्रेमसंबंध, महिलेच्या नातेवाईकांकडून अमानुष मारहाण, चटके देऊन संपवलं

ADVERTISEMENT

 Nanded Crime News
Nanded Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नांदेडच्या तरुणाचा कर्नाटकात खून

point

विवाहित महिलेसोबत होते प्रेम संबंध

point

महिलेच्या नातेवाईकांकडून अमानुष मारहाण, चटके देऊन संपवलं

Nanded Crime News : प्रेमसंबंधातून कर्नाटकात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमधील मुखेड तालुक्यातल्या गोणेगाव येथील 21 वर्षीय विष्णूकांत पांचाळ या तरुणाला प्रेमसंबंध असलेल्या विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करून ठार केल्याची घटना उघडकीस आलीये. या घटनेने नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेडमधील तरुणाचे कर्नाटकातील महिलेसोबत होते प्रेमसंबंध 

मिळालेल्या माहितीनुसार, गोणेगावचा रहिवासी विष्णूकांत पांचाळ याचे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील नागमप्पली येथील विवाहित महिलेबरोबर गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याबद्दल त्या महिलेच्या नातेवाईकांना राग होता. त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी महिलेचे नातेवाईक गजानन आणि अशोक यांनी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावले. प्रेमाच्या नावाखाली बोलावून घेतलेल्या या भेटीचे रूपांतर काही क्षणांतच भयानक हत्याकांडात झाले.

सदर दोघांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी विष्णूकांतचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याचा अमानुष छळ केला. त्याच्या शरीरावर गरम वस्तूने चटके दिले, मारहाण केली आणि निर्दयपणे त्याला रक्तबंबाळ केले. या अत्याचारामुळे विष्णूकांत गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला तात्काळ हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. तर विष्णूकांतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेमसंबंधामुळे निर्दयीपणे जीव गमवावा लागल्याने गावात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पीडितेला सर्वात जास्त कॉल कोणाचे? पोलिसांनी WhatsApp चॅटही काढले

हे वाचलं का?

    follow whatsapp