सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पीडितेला सर्वात जास्त कॉल कोणाचे? पोलिसांनी WhatsApp चॅटही काढले
Satara doctor suicide case : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पीडितेला सर्वात जास्त कॉल कोणाचे? पोलिसांनी WhatsApp चॅटही काढले
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट
पीडितेला सर्वात जास्त कॉल कोणाचे?
पोलिसांनी WhatsApp चॅटही काढले
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी तपासाचा वेग वाढला असून, पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकरणात डॉक्टर प्रशांत बनकर यांचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअप चॅटिंग तपासात समोर आले असून, बनकर यांनी सर्वाधिक कॉल मृत डॉक्टर महिलेला केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर आणि मृत डॉक्टर यांच्यात सतत संपर्क सुरू होता. या दोघांमधील व्हॉट्सअप चॅटिंगही झाले होते, मात्र ते चॅट नंतर डिलीट करण्यात आले. पोलिसांनी हे चॅट फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत पुन्हा प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मृत डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता रूम ताब्यात घेतली होती. त्या एकट्याच आत गेल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास त्यांच्या डॉक्टर बहिणीचा सतत कॉल येत होता, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. हॉटेलमधील वेटरने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शंका घेतली आणि दरवाजा ठोठावला, तरीही आतून काही प्रतिसाद आला नाही. अखेरीस दरवाजा उघडण्यात आला तेव्हा डॉक्टरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा : 'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला










