Satish Shah: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं निधन, अवघ्यांना हसवणारा 'तो' तारा निखळला!

मुंबई तक

satish shah passed away : हिंदी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीर आणि दिग्गज सिनेअभिनेते सतीश शाह यांचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला.

ADVERTISEMENT

satish shah passed away
satish shah passed away
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते सतीश शाह यांचं निधन

point

किडनीशी संबंधित आजाराने ग्रासल्याचं कारण समोर

satish shah passed away : हिंदी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीर आणि दिग्गज सिनेअभिनेते सतीश शाह यांचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण समोर आलं आहे. त्यांना किडनीशी संबंधित आजाराने ग्रासले होते. त्यांच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सतीश शाह यांच्यावर 26 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : पनवेल: भलत्याच मृतदेहवर अंत्यसंस्कार, कोणाच्या हातून घडली एवढी मोठी चूक?

वयाच्या 47 व्या वर्षी सतीश शाहांचा अंतिम श्वास

वयाच्या 47 व्या वर्षी सतीश शाह यांनी अंतिम श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. असरानी आणि पियुष पांडे यांच्या निधनानंतर सतीश शाह यांच्या निधनाची बातमी समोर आली. या घटनेनं बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. 

सतीश शाह यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण सराभाई VS साराभाई या टीव्ही शोमध्ये साराभाई, ज्याला इंदू अशी ओळख निर्माण झाली. या भूमिकेनं त्यांची ओळख देशभरातली घराघरात पोहोचली आणि ते लोकप्रिय झाले. या शोमध्ये सतीश यांच्या अभिनायाचे विशेषकरून कौतुक केलं गेलं. आजही काही शोच्या क्लिप्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. 

सतीश शाह यांचं शिक्षण 

दरम्यान, सतीश शाह यांचा जन्म हा गुजरात राज्यातील मांडवी येथे झाला होता. त्यानंतर त्यांनी झेवियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिस्ट्यूट ऑफ इंडियात शिक्षण घेतलं. 1972 साली सतीशने डिझायरने मधु शाहशी विवाह केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp