पत्नीचा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला विरोध! संपातलेल्या पतीने थेट घराच्या छतावरून खाली फेकलं अन्...
एका तरुणाने आपल्या पत्नीला घराच्या छतावरून खाली फेकल्याचं सांगितलं जात आहे. पीडित पत्नीने आपल्या पतीला शारीरिक संबंध बनवण्यास नकार दिल्याने आरोपी पतीने हे कृत्य केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीचा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला विरोध!
पतीने थेट घराच्या छतावरून खाली फेकलं अन्...
Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून पती आणि पत्नीमधील वादामुळे धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील मऊरानीपुर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीला घराच्या छतावरून खाली फेकल्याचं सांगितलं जात आहे. पीडित पत्नीने आपल्या पतीला शारीरिक संबंध बनवण्यास नकार दिल्याने आरोपी पतीने हे कृत्य केल्याची माहिती आहे. या जीवघेण्या हल्ल्यात महिलेला गंभीररित्या दुखापत झाली असून तिला झासीच्या मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं आहे. पोलिसांनी आता आरोपी पतीविरुद्धा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.
ही घटना झाशीच्या मौरानीपूर पोलीस स्टेशन परिसरातील सायवारी गावात घडली. या गावातील रहिवासी असलेल्या मुकेश अहिरवार नावाच्या तरुणाचं तीन वर्षांपूर्वी तीजा नावाच्या महिलेसोबत प्रेमविवाह झाला होता. पीडित पत्नीने सांगितलं की, लग्नापूर्वी मुकेश बऱ्याचदा तिच्या घरी जायचा. एके दिवशी, तीजाच्या कुटुंबियांनी तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडलं. त्यानंतर 2022 मध्ये त्या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं, परंतु एका वर्षानंतर पतीचं तिच्या पत्नीसोबत वर्तन बदललं.
हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 2500 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर... कधीपर्यंत कराल अर्ज?
पतीने बळजबरी केली...
आरोपी पती आपल्या पत्नीसोबत सतत भांडायचा आणि तिला मारहाण करायचा. पीडित तीजाच्या म्हणण्यानुसार, मुकेशने आदल्या दिवशी तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती केली होती आणि आज त्याने पुन्हा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तीजा आपल्या पतीला विरोध करत म्हणाली, "जर तुला माझी काळजी नाही तर तुला माझ्याशी शारीरिक संबंध का ठेवायचे आहेत?” मुकेशला त्याच्या पत्नीचं हे बोलणं ऐकून अतिशय संतापला आणि त्याने रागाच्या भरात तीजावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यावेळी, आरोपी मुकेशने पत्नीला घराच्या छतावरून ढकलून दिलं. दरम्यान, महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या तीजाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे ही वाचा: वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम, साताऱ्यातील विद्यार्थ्याचं वसतीगृहात असताना भयानक पाऊल
कुटुंबियांनी दिली माहिती
सामुदायिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी माहिती देताना सांगितलं की, तीजा नावाच्या महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पीडित तीजाला छतावरून खाली फेकण्यात आल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. ते म्हणाले की, "घटनेनंतर गंभीररित्या जखमी झालेल्या तीजाला प्राथमिक उपचार दिल्यानंतर, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चांगल्या उपचारांसाठी झाशी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं.” घटनेची माहिती मिळताच मऊरानीपुर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.










