वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम, साताऱ्यातील विद्यार्थ्याचं वसतीगृहात असताना भयानक पाऊल
Satara Crime : वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम, साताऱ्यातील विद्यार्थ्याने वडिलांना मेसेज करत वसतीगृहात असताना केली आत्महत्या
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम
साताऱ्यातील विद्यार्थ्याचं वसतीगृहात असताना भयानक पाऊल
Satara Crime : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाचा ताण आणि वयाने मोठ्या असलेल्या युवतीवरील प्रेमाला विरोध होईल या भीतीतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या मुलाने आपल्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत नैराश्यात असल्याची कबुली दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
17 वर्षीय तरुणाने वसतीगृहात उचललं टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी मूळचा पाटण तालुक्यातील असून, शिक्षणासाठी साताऱ्यातील एका वसतिगृहात राहात होता. दिवाळीच्या सुटीनंतर तो नुकताच वसतिगृहात परतला होता. मात्र, सुट्टी संपून आल्याच्या दोन दिवसांनीच त्याने मध्यरात्री आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्याने आपल्या वडिलांना एक भावनिक मेसेज पाठवला होता, जो त्यांनी सकाळी वाचला आणि त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध घेतला असता, त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
हेही वाचा : सातारा : मोबाईलच्या अतिवापरावरून दिलेला सल्ला ठरला जीवघेणा; अल्पवयीन रूममेटने गळा आवळून केला खून
घरच्यांकडून प्रेमाला विरोध होण्याची भीती
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याची बहीणही एका मुलावर प्रेम करत होती. कुटुंबीयांनी तिच्या प्रेमसंबंधांना विरोध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्याला आपल्या प्रेमालाही घरच्यांकडून विरोध होईल, अशी भीती सतावत होती. त्याचबरोबर शिक्षणाचा ताण आणि मानसिक दडपण या सर्व गोष्टींनी तो कोलमडून गेला होता. त्यामुळे त्याने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून आपलं आयुष्य संपवलं.










