Mahayuti : भाजपला 28 जागा, राष्ट्रवादीला 5; तर शिंदेंच्या शिवसेनेला...; काय ठरला फॉर्म्युला?
Mahayuti seat distribution maharashtra : मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई, शिर्डी, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या पाच जागांसाठी सध्या उमेदवार जाहीर व्हायचे आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होणार

शिवसेनेला किंवा भाजपला गमवावी लागू शकते एक जागा

महायुतीचे जागावाटप कसे होणार?
Mahayuti lok Sahba Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महायुतीमध्ये जवळपास एकमत झाले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळणार आहेत. भाजप २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5 मिळणार आहेत. (Consensus reached on seat sharing in Mahayuti alliance)
महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे. याची घोषणा गुरुवारी (२८ मार्च) होणार आहे. अजित पवारांनी याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीत भाजप २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
याशिवाय शिवसेना (शिंदे गट) 14 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच राष्ट्रवादीला (अजित पवार गट) ५ जागा सोडल्या जातील. राष्ट्रीय समाज पक्षालाही एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) एक जागा दिल्यास शिवसेना (शिंदे गट) किंवा भाजपला एक जागा गमवावी लागेल.
शिवसेनेच्या संभाव्य जागा
1. रामटेक
2. बुलढाणा
3. यवतमाळ-वाशीम
4. हिंगोली
5. कोल्हापूर
6. हातकणंगले
7. औरंगाबाद
8. मावळ
9. शिर्डी
10. पालघर
11. कल्याण
12. ठाणे
13. दक्षिण मध्य मुंबई
14. उत्तर पश्चिम मुंबई