"तब्बल 'इतकी' मते वगळण्याचा प्रयत्न..." राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला केलं टार्गेट, पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
आज राहुल गांधी यांची नवी दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात पत्रकार परिषद सुरू आहे. या परिषदेदरम्यान, राहुल गांधी 'मत चोरी' संबंधित नवीन पुरावे किंवा खुलासे सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला केलं टार्गेट

पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Rahul Gandhi Press Conference: आज राहुल गांधी यांची नवी दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात पत्रकार परिषद सुरू आहे. या परिषदेदरम्यान, राहुल गांधी 'मत चोरी' संबंधित नवीन पुरावे किंवा खुलासे सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी संबंधित प्रकरणासंदर्भात बोलताना 'हायड्रोजन बॉम्ब' असा उल्लेख केला होता. राहुल गांधी ज्या 'हायड्रोजन बॉम्ब' चा वारंवार उल्लेख करत आहेत, ते प्रत्यक्षात एक अत्यंत विध्वंसक शस्त्र आहे. हे बऱ्याचदा 'थर्मोन्यूक्लियर बॉम्ब' म्हणूनही ओळखले जातं. या परिषदेत ते नेमकं काय म्हणत आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
"देशातील दलित आणि ओबीसी हे माझे लक्ष्य..."
राहुल गांधी यांनी परिषदेत सांगितलं की "खरंतर, हा हायड्रोजन बॉम्ब नाहीये. खरा हायड्रोजन बॉम्ब अजून यायचा आहे. या देशातील तरुणांना निवडणुका कशा प्रकारे गोंधळात टाकल्या जात आहेत, हे दाखवण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे." त्यांनी म्हटलं की "मी माझे विचार ठोस पुराव्यांसह मांडत आहे. देशातील दलित आणि ओबीसी हे माझे लक्ष्य आहेत. मला माझ्या देश आणि संविधानावर प्रेम आहे आणि मी त्याचं रक्षण करेन." कर्नाटकातील आलंदमध्ये 6018 मते नष्ट करण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
हे ही वाचा: ZP President Reservation: पाहा तुमच्या जिल्ह्यात ZP अध्यक्ष कोण असेल, यादीच आली समोर... जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर!
"6018 मते वगळण्याचा प्रयत्न.."
परिषदेत राहुल यांनी पुढे सांगितलं की आलंद हा कर्नाटकातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथली 6018 मते कोणीतरी वगळण्याचा प्रयत्न केला. 2023 च्या निवडणुकीत वगळण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या आम्हाला माहिती नाही, परंतु ही संख्या 6018 पेक्षा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे. खरंतर 6018 मते हटवताना, हे प्रकरण चुकून उघड झाले. एका बूथ-लेव्हल अधिकाऱ्याला त्याच्या काकांचं मत हटवल्याचं लक्षात आलं. त्याने त्याच्या काकांचं मत कोणी डिलीट केलं, याचा तपास केला आणि हे शेजाऱ्याने केलं असल्याचं आढळलं. जेव्हा त्याने त्याच्या शेजाऱ्याला विचारले तेव्हा त्याने सांगितलं की त्याने कोणतेही मत डिलीट केलेले नाही. याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीने मत हटवलं किंवा ज्याचं मत हटवले त्यांना त्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. प्रत्यक्षात, दुसऱ्याच ताकदीने सिस्टिम हायजॅक केली होती आणि ही मते हटवली होती."
"100 टक्के खरंच बोलणार..."
राहुल गांधी म्हणाले की, "भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. मी या व्यासपीठावरून असं काहीही बोलणार नाही जे 100 टक्के खरं नसेल. मी असा एक माणूस आहे जो देशावर प्रेम करतो, संविधानावर प्रेम करतो, लोकशाही प्रक्रियेवर प्रेम करतो आणि मी त्या प्रक्रियेचं समर्थन करतो. मी इथे असं काहीही बोलणार नाही जे 100 टक्के पुराव्यांवर आधारित नसेल आणि जे तुम्ही पडताळू शकत नाही."