4 वर्षांच्या चिमुकलीवर कर्मचाऱ्यांकडून शारीरिक अत्याचार! मुंबईतील शाळेत घडला धक्कादायक प्रकार...

मुंबई तक

चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील शाळेत घडला धक्कादायक प्रकार...
मुंबईतील शाळेत घडला धक्कादायक प्रकार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

4 वर्षांच्या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार!

point

मुंबईतील शाळेत घडला धक्कादायक प्रकार...

MumbaI Crime: सध्या, देशात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील गोरेगावच्या प्रशस्त परिसरात देखील अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. 

पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना...

मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी 16 सप्टेंबर रोजी एका 40 वर्षीय महिला कर्मचाऱ्याला अटक केल्याचं समोर आलं आहे. खरंतर, 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्या दिवशी, सकाळी पीडितेच्या आजीने आपल्या नातीला शाळेत सोडलं. पण, शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी परतल्यानंतर, तिने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याचं आईला सांगितलं. त्यानंतर, कुटुंबियांनी मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली आणि शाळेतील प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा: नवरा सतत आजारी... वहिनीसोबत दोन्ही दीर करायचे नको ते कृत्य पण अचानक...

पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

या संपूर्ण घटनेनंतर, पीडितेच्या कुटुंबियांनी पोक्सो कायद्यांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने पीडितेच्या शाळेतील महिला कर्मचाऱ्याला अटक केली. आरोपी महिलेने शाळेतील चार वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनीच्या शरीराला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे. प्रकरणाच्या तपासादरम्यान, संबंधित महिला मागील दोन वर्षांपासून शाळेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या, पोलीस या प्रकरणाच्या तपासात शाळेतील CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजचा तपास करत असून त्या शाळेतील इतर तीन सह-कर्माचाऱ्यांची देखील चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: मोठी बातमी: अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरचा थेट Encounter, पोलिसांनी आरोपींना धाडलं यमसदनी

विद्यार्थ्यांची सुरक्षिततेबाबत प्रश्न...

मुंबईतील शाळेत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, कर्मचाऱ्यांचं निरीक्षण आणि प्रशासकीय पारदर्शकता याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची तसेच, शाळांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांकडून केली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp