राज्यातील कोकण भागात पावसाची परिस्थिती कायम, पूरजन्य परिस्थिती असलेल्या मराठवाड्याच कशी असेल स्थिती?
Maharashtra Weather : हवामान विभागाने (IMD) 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात पावसाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या विविध भागांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

IMD हवामानाचा अंदाज

राज्याच्या विविध भागांत कसा असेल पावसाची परिस्थिती?
Maharashtra Weather : हवामान विभागाने (IMD) 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात पावसाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या विविध भागांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक, नेमकं काय घडलं?
कोकण :
कोकण भागात पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. यापैकी पालघर जिल्ह्यात पावसाच्या संतत धारा पडतील. तर ठाणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र :
कोकणानंतर मध्य महाराष्ट्रात धुळे, नाशिक, नंदुरबार, नाशिक घाटमाथा, सातारा, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा आणि सांगलीत पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. या प्रत्येक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.