Beed: दाजी जाम चिडला, मेव्हण्याचं हॉटेलच टाकलं जाळून कारण बायको...

Beed Crime: बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी पुन्हा सासरी येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या भावाचे हॉटेलच जाळून टाकले.

ADVERTISEMENT

wife went to her mothers house so the angry husband set fire to his wife brothers hotel in beed
मेव्हण्याचं हॉटेलच टाकलं जाळून
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: बायको नांदायला येत नसल्याने वैतागलेल्या एका नवऱ्याने चक्क आपल्या मेव्हण्याचे हॉटेल पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.. यात हॉटेलमधील तब्बल 70 ते 80 हजार रुपयाचे सामान जळून खाक झालं आहे. त्यामुळे मेव्हण्याचं बरंच नुकसान झालं आहे.

नेमकी घटना काय?

केज तालुक्यातील कदमवाडी नानाभाऊ कदम यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचे लग्न 8 वर्षांपूर्वी सोनिजवळा येथील तानाजी रामदास गायकवाड याचे सोबत झालेले आहे. त्यांना 3 मुलं देखील आहेत. तानाजी गायकवाड हा नेहमी त्याची पत्नी ज्ञानेश्वरी हिला मारहाण करीत असल्याने ज्ञानेश्वरी ही तिच्या तिन्ही मुलांसह माहेर असलेल्या कदमवाडी ता. केज येथे तिचा भाऊ आसाराम कदम यांच्याकडे राहण्यास गेली होती.

हे ही वाचा>> पती बाहेर गेला आणि भलताच पुरूष आला बेडरूममध्ये पत्नीचे अश्लील चाळे सुरू असतानाच पतीची एंट्री, नंतर...

मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यामुळे तिचा पती तानाजी गायकवाड हा कदमवाडी येथे येऊन जर त्याची बायको ज्ञानेश्वरी हिला आपल्याकडे नांदायला पाठविले नाही तर मेव्हणे आसाराम कदम यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गेला होता. तसंच तुमचं नुकसान करीन अशीही त्याने धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी तानाजी गायकवाड याने रात्रीच्या सुमारास मेव्हणा आसाराम कदम याच्या हॉटेलमध्ये कोणी नसताना त्याला आग लावली. केज-बीड रोडवर टाकळी शिवारातील गट नंबर 106 मध्ये असलेले हॉटेल तानाजीने पेटवून दिलं. या आगीत हॉटेलचे पत्र्याचे शेडसह हॉटेलमधील डीप फ्रिज, साधे फ्रिज, काउंटर, खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे 70 ते 80 हजार रूपयाचे नुकसान झालेले आहे.

हे ही वाचा>> 17 वर्षाच्या मुलाला घरी बोलावून 33 वर्षाची महिला करत होती शारीरिक संबंध, मुलीने नको त्या अवस्थेत पाहिलं अन्...

या प्रकरणी आसाराम कदम यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात तानाजी गायकवाड याच्या विरुद्ध गु. र. नं. 503/2025 भा. न्या. सं. 326(जी), 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे हे याप्रकरणी तपास करीत आहेत.

पत्नीने यापूर्वीही मारहाणीची केलेली तक्रार

तानाजी कदम हा त्याची पत्नी ज्ञानेश्वरी हिस मारहाण करून छळ करीत असल्याने या पूर्वी ज्ञानेश्वरी हिने युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध दोन वेळा तक्रार दिलेली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp