पती बाहेर गेला आणि भलताच पुरूष आला बेडरूममध्ये पत्नीचे अश्लील चाळे सुरू असतानाच पतीची एंट्री, नंतर...
crime news : नवऱ्याने आपल्याच बायकोला परपुरूषासोबत पाहिल्यानंतर पत्नीच्याच गळ्यात चप्पलांचे हार घालून रस्त्यावरून धिंड काढली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याने बायकोच्या गळ्यात चप्पलांचा हार घालत काढली
नेमकं काय घडलं?
crime news : नवरा आणि बायको यांच्या नात्यात वादविवाद होणे ही सामान्य बाब आहे. या दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या वादामुळे दोघांचं नातं अनेकदा खराब होतं. दोघांमध्ये टोकाचा वाद निर्माण झाल्यास अनेकदा टोकाची भूमिका घेतात आणि दोघेही एकमेकांना एखाद्या शत्रूप्रमाणे वागणूक देतात. या प्रकरणातील पत्नी ही शाळेत शिक्षिका असून पती हा महाविद्यालयात व्याख्याताचं काम करतो. असे असूनही, त्याने आपल्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी गळ्यात चप्पलांचा हार घालत अपमानित केले. संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील बनवला आहे.
हे ही वाचा : बीड ! लेक करत होती पोलीस भरतीची तयारी, ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य, नंतर टोकाचं पाऊल उचलत...
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. पोलिसांनी व्याख्याता आणि त्याच्या जोडीदाराला अटक केली आहे. हे प्रकरण ओडिशातील पुरी जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, ओडिशातून महिलांवरील अन्याय-अत्याचाराचे अनेक व्हिडिओ सध्या समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान दोघांनाही एक 14 वर्षांचा मुलगा देखील असल्याचं समजतंय. त्यांच्या नात्यात बिघाड झाल्याने ते वेगळं राहतात.
पत्नीचे परपुरूषाशी प्रेमसंबंध
संबंधित प्रकरणात पतीला संशय आला की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्याच कोणीशी तरी प्रेमसंबंध आहेत. गेल्या मंगळवारी रात्री 8 वाजता पत्नीच्या खोलीत घुसला. तेव्हा तिथे त्यांनी पाहिलं की, आपली पत्नी तिच्या एका मित्रासोबत आहे आणि तो तरुण दुसरा तिसरा नसून शिक्षक आहे. हे सर्व पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली असता, बेदम मारहाण केली.
पत्नी आणि मित्राच्या गळ्यात चप्पलांचा हार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही घराच्या बाहेर फरफटत आणलं आणि तमाशा घालायला सुरुवात केली. तिचा नवरा इथवर न थांबता त्याने आपल्या पत्नीला आणि तिच्या मित्राच्या गळ्यात चप्पलांचा हार घातला. अशातच हे सर्व चित्र पाहण्यासाठी हे सर्व लोक घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी हे सर्व सुरू असलेलं प्रकरण कॅमेऱ्यात कैद केले.










