वडिलांना दारूचं व्यसन अन् आई सतत ओरडायची... 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल!

एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल!
12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वडिलांना दारूचं व्यसन अन् आई सतत ओरडायची...

point

12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल!

Suicide Case: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुलाच्या आईने त्याला शिवीगाळ करत जेवायला दिलं आणि नंतर खोली बाहेरून कुलूप लावून कामावर गेल्याचं सांगितलं जात आहे. रात्री उशिरा आई घरी परतली तेव्हा मुलगा फाशीला लटकलेला आढळला.

मुलगा खूप मस्ती करायचा... 

मिळालेल्या माहितीनुसार, निशा नावाची एक महिला आपल्या मुलासोबत मानपूर परिसरात भाड्याच्या घरात राहत होती. संबंधित मुलाचं नाव कृष्णा असून तो हिंदू मॉडेल कॉलेजमध्ये सहावीत शिकत होता. तो अभ्यासात खूप हुशार होता, अशी माहिती आहे. पण तो बऱ्याचदा रस्त्यावर खेळत मस्ती करायचा. आसपासच्या परिसरातील लोकांनी कृष्णाबद्दल त्याच्या आईकडे यापूर्वी खूप वेळा तक्रार केली होती.

कृष्णा फासावर लटकलेल्या अवस्थेत... 

शनिवारी त्याची आई त्याला अशा वागणुकीबद्दल ओरडली. त्या दिवशी, दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या आईने त्याला जेवण दिलं आणि तो झोपी गेल्यावर निशाने खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर, ती जवळच्या कारखान्यात कामावर गेली. रात्री कामावरून परतल्यावर ती थेट कृष्णाच्या खोलीत गेली. तिथे कृष्णा फासावर लटकलेला आढळला. हे पाहून तिच्या आईला मोठा धक्का बसला आणि ती ओरडू लागली. निशाचा आवाज ऐकून घरमालक आणि आजूबाजूचे लोक तिथे पोहोचले. त्यानंतर, या सगळ्या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

हे ही वाचा: शाळेतील मुख्याध्यापकावरच जडलं प्रेम, बनावट सोशल मीडिया अकाउंट... अचानक दुसऱ्या शिक्षिकेची एन्ट्री अन्..

वडिलांना दारूचं व्यसन 

कृष्णाच्या वडिलांना दारूचं व्यसन असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यामुळे घरात सतत वाद व्हायचे. जवळपास 8 ते 9 दिवसांपूर्वी कृष्णाच्या वडिलांनी दारूच्या नशेत पत्नी आणि मुलाला मारहाण केली. यानंतर ते घराबाहेर पडले आणि परत आलेच नाहीत. पतीशी झालेल्या भांडणानंतर निशा एका कारखान्यात काम करून घर चालवत होती. ती दुपारच्या जेवणाच्या वेळी मुलाला जेवण देण्यासाठी घरी यायची.

वडिलांच्या मारहाणीमुळे आत्महत्येचा विचार 

लोकांनी सांगितल्याप्रमाणे, वडिलांच्या मारहाणीमुळे कृष्णाने बऱ्याचदा आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. तो लहान मुलगा रागाच्या भरात असे बोलत असल्याचं तिच्या आईला वाटलं, परंतु शनिवारी त्याने प्रत्यक्षात आत्महत्या केली.

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! तब्बल 25,000 हून अधिक इमारतींच्या OC चा प्रश्नच मिटला, आता...

प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलीस अधिकारी तात्काळ पथकासह तिथे पोहोचले. पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 12 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि तपासानंतरच खरी कारणे उघडकीस येतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलीस प्रत्येक बाजूंनी चौकशी करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp