शाळेतील मुख्याध्यापकावरच जडलं प्रेम, बनावट सोशल मीडिया अकाउंट... अचानक दुसऱ्या शिक्षिकेची एन्ट्री अन्..
शाळेतील मुख्याध्यापकाच्या प्रेमात वेडी झालेल्या एका शिक्षिकेने खोटं सोशल मिडिया अकाउंट तयार केलं आणि त्यामुळे जे काही घडलं, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शाळेतील मुख्याध्यापकावरच जडलं शिक्षिकेचं प्रेम

बनावट सोशल मीडिया अकाउंट केलं तयार अन्...
Crime News: विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या प्रेमसंबंधातून बऱ्याच चकित करणाऱ्या घटना घडत असल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. परंतु, शाळेतील मुख्याध्यापकाच्या प्रेमात वेडी झालेल्या शिक्षिकेबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? शाळेतील मुख्याध्यापकाच्या प्रेमात वेडी झालेल्या एका शिक्षिकेने खोटं सोशल मिडिया अकाउंट तयार केलं आणि त्यामुळे जे काही घडलं, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
शाळेतील मुख्याध्यापकावर जडलं प्रेम...
संबंधित प्रकरण हे दिल्लीतील एका नामवंत शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे. शाळेतील मुख्याध्यापकाला आपला मार्गदर्शक आणि गुरु मानणाऱ्या एका शिक्षिकेचा मुख्याध्यापकांवरच जीव जडला. मुख्याध्यापकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिने विविध प्रकारच्या युक्तींचा वापर करायला सुरुवात केली. कधी ती फेक आयडी तयार करून आपल्या आजाराचा खोटा नाटक करायची, तर कधी तिला कॅन्सर झाल्याचं विद्यार्थ्यांकडून खोटं बोलवून घ्यायची. विद्यार्थ्यांच्या सोशल मिडिया अंकाउंटवर तिने आपले एडिट केलेले फोटो टाकायला लावले, ज्यामध्ये ती स्वतःला आजारी असल्याचं दाखवत होती. यामध्येच पुढे तिने आपला मृत्यू झाल्याची अफवा पसरवली, जेणेकरून मुख्याध्यापक तिला आठवतील आणि भावूक होतील. एवढंच नाही तर तिने तंत्र-मंत्रासारख्या गोष्टींचा देखील आधार घेतला.
हे ही वाचा: "पप्पा दारू पिऊन मला खोलीत नेतात आणि माझ्यासोबत...", पीडितेने शिक्षिकेला वडिलांच्या 'त्या' कृत्याबद्दल सगळंच सांगितलं...
बनावट अकाउंट तयार केले...
मुख्याध्यापकाने शाळेतील आणखी एका दुसऱ्या शिक्षिकेसोबत जवळीक साधल्याचं तिला कळालं आणि ती प्रचंड संतापली. आता तिने त्या संबंधित शिक्षिकेला टार्गेट करायला सुरुवात केली. तिने खोटं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं, त्यावर त्या शिक्षिकेचे एडिट केलेले फोटो टाकले आणि तिचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला.
6 सप्टेंबर रोजी दुसऱ्या शिक्षिकेने तिचे एडिट केलेले फोटो पाहिले आणि तिने लगेच पोलिसांशी संपर्क साधला. संबंधित शिक्षिका दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरातील रहिवासी होती. कोणीतरी तिची बनावट आयडी तयार केली असून तिच्या ओळखीच्या व्यक्ती, विद्यार्थी आणि सहकर्मचाऱ्यांना फॉलोच्या विनंत्या पाठवून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिने तक्रारीत सांगितलं. पोलिसांनी लगेच या प्रकरणाचा तपास सुरू केला. फोटो आणि बनावट अकाउंटची चौकशी करण्यात आली. त्यानंतर, तपासादरम्यान ई-मेल आयडीच्या आधारे पोलीस थेट आरोपीपर्यंत पोहोचले.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करताय? 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज...
पोलिसांचा तपास
पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला तिच्या घरातून अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, सुरुवातीला तिनं स्वतःला 'पीडित' म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कुणी तिच्या नावावर देखील खोटे अकाउंट तयार केले असल्याचं तिने सांगितलं. परंतु कठोर चौकशीनंतर सत्य घटना समोर आली. त्यावेळी, तीच सर्व बनावट खाते तयार करत होती आणि फोटो एडिट करून ती अफवा पसरवत होती. मुख्याध्यापकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी आरोपी शिक्षिकेने हे सगळं केल्याचं तिने कबूल केलं.