"पप्पा दारू पिऊन मला खोलीत नेतात आणि माझ्यासोबत..." पीडितेने शिक्षिकेला वडिलांच्या 'त्या' कृत्याबद्दल सगळंच सांगितलं...
वडीलच आपल्या दोन मुलीसोंबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. शाळेतील एका विद्यार्थीनीने आपल्या शिक्षिकेला तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडिलांकडून आपल्याच मुलींचं लैंगिक शोषण...

पीडितेने शिक्षिकेला वडिलांच्या 'त्या' कृत्याबद्दल सगळंच सांगितलं
Crime News: दिल्लीतील गुरुग्राममधून नातेसंबंधाला लाज आणणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे वडीलच आपल्या दोन मुलीसोंबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. शाळेतील एका विद्यार्थीनीने आपल्या शिक्षिकेला तिच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं, तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
वडिलांकडून मुलींचं लैंगिक शोषण
एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने शाळेत तिच्या शिक्षिकेला आपल्या वडिलांच्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितल्यानंतर हे सगळं उघडकीस आलं. मुलीने तिच्या शिक्षिकेशी बोलताना आपल्या वडिलांना दारूचं व्यसन असल्याचं सांगितलं. ते सतत पीडितेला खोलीत फरफटत घेऊन जायचे आणि तिला मारहाण करत तिचं लैंगिक शोषण करायचे. विद्यार्थीनीचं बोलणं ऐकून शिक्षिकेला मोठा धक्का बसला. तसेच, तिच्या 17 वर्षीय मोठ्या बहिणीसोबत सुद्धा वडिलांनी घृणास्पद कृत्य केल्याचं पीडित मुलीने सांगितलं.
हे ही वाचा: वडिलांनी केलं दोन महिलांसोबत लग्न अन् नंतर पहिल्या मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य! 6 दिवसांपर्यंत...
शिक्षिकेने केली तक्रार दाखल...
आरोपीने आपल्या मोठ्या मुलीचं शाळेला जाणं बंद केलं होतं आणि तिला घरातच बंदिस्त करून ठेवलं होतं. शिक्षिकेने लगेच पीडितेच्या आईशी संपर्क साधला. त्यावेळी आईने वडिलांच्या अशा घाणेरड्या कृत्याला विरोध केला असता तिला देखील आरोपी मारहाण करत असल्याचं पीडितेच्या आईने शिक्षिकेला सांगितलं. त्यानंतर, तातडीने संबंधित शिक्षिकेने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
हे ही वाचा: शाकाहारी पत्नीला चिकन बनवायला सांगितलं, पत्नीने दिला नकार! अखेर पतीने ऐकलंच नाही अन् घडलं भयानक...
पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणासंबंधी पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपीविरोधात पॉक्सो अॅक्ट अंतर्गत इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सध्या कोणतीच नोकरी करत नव्हता. पोलिसांकडून दोन पीडित अल्पवयीन मुलींना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांची काउन्सलिंग सुरू आहे.