बीड ! लेक करत होती पोलीस भरतीची तयारी, ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य, नंतर टोकाचं पाऊल उचलत...
OBC Reservation Suicide : मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण दिल्याने बीडमधील ओबीसी तरुणाने आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण

ओबीसी तरुणाने संपवलं जीवन

मुलगी करत होती पोलीस भरती
OBC Reservation Suicide : मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईत धडकले होते. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण दिले. मात्र, आता त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील लोक पेटून उठले आहेत. तसेच नुकत्याच एका लातूरमधील एका तरुणाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं. त्यांच्या भेटीला मंत्री छIगन भुजबळ भेटीला गेले होते. त्यानंतर आता आणखी एका ओबीसी आरक्षण बचावासाठी तरुणाने आत्महत्या केली आहे.
हे ही वाचा : व्हिसा एजंटला डिनरला बोलवून केलं अपहरण! निर्दयीपणे केली मारहाण अन् अश्लील व्हिडीओ सुद्धा...
ओबीसी समाजात व्यक्तीची दुसरी आत्महत्या
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील गोरक्षक देवडकर यांनी टोकाची भूमिका गळफास घेत आत्महत्या केली. गोरक्षक देवडकरची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. ओबीसीतीलं आरक्षण संपत असल्याने नैरश्याने गोरक्षक देवडकरने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे.
घरातील करता पुरूष गेल्याने कुटुंबाचे हाल होतील, अशी हळहळ कुटुंबियांनी केली आहे. आता इथून पुढे आमची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो. माझे वडील गेले पण, आमची जबाबदारी कोण घेणार? असा भावनिक सवाल गोरक्षक देवडकरच्या मुलीने केला आहे. सरकारने यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी तिने केली आहे.
घटनेची पुनरावृत्ती
दरम्यान, लातूरच्या भरत कराड (वय 35) या तरुणाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट दिल्याच्या कारणावरून तरुणाने वाहत्या नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. भरतने सुसाईड नोटमध्येही ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचं पाहूणंच आत्महत्या केली आहे.
हे ही वाचा : वडिलांना दारूचं व्यसन अन् आई सतत ओरडायची... 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल!
सुसाईट नोटमध्ये नेमकं काय होतं?
'मी भरत महादेव कराड आताच्या महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसींच्या आंदोलनात वेळोवेळी सहभाग घेतला होता. तरीही ओबीसीविरोधात जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरुपी गमावत आहे. माझ्या पाठीमागे कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा', अशी सुसाईड नोट लिहिली होती.