Maharashtra Weather: कोकणात पावसाचा हाहाकार, संपूर्ण राज्यात पाऊस बरसणार.. पाहा कसं आहे आजचं हवामान
Maharashtra Weather Today: हवामान विभागाने 16 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जारी केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हवामान विभागाचा अंदाज

राज्यभरातील पावसाची महत्त्वाची अपडेट
Maharashtra Weather : हवामान विभागाने 16 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जारी केली आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. संबंधित हवामानाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : वडिलांची हत्या केली अन् मृतदेहासोबत झोपला... अशा गुन्हेगारांची नेमकी मानसिक स्थिती काय असते?
कोकण भाग :
कोकण भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी विजांचा गडागडाट आणि मेघगर्जनेसह हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान हे 27 ते 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 22-25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा आणि चंद्रपुरात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान हे 28-32 अंश सेल्सिअस असणार आहे. तर किमान 23-26 अंश सेल्सिअस असेल.
हे ही वाचा : पोटच्या मुलांनीच आईचा गळा दाबत संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, ओतूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका ते ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. कमाल तापमान हे 27 ते 30 अंश सेल्सिअस असेल. तर किमान तापमान हे 22 ते 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.