वडिलांची हत्या केली अन् मृतदेहासोबत झोपला... अशा गुन्हेगारांची नेमकी मानसिक स्थिती काय असते?
एखाद्या मुलाने, पतीने, पत्नीने, महिलेने किंवा पुरूषाने असं घृणास्पद कृत्य केल्याची ही पहिलीच घटना नाही. अशातच, हत्येनंतर मृतदेहासोबत झोपणाऱ्या लोकांची मानसिक स्थिती नेमकी काय असते? असा प्रश्न उद्भवतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

डिलांची हत्या केली अन् मृतदेहासोबत झोपला...

अशा गुन्हेगारांची नेमकी मानसिक स्थिती काय असते?
Crime News: नोएडाच्या सर्फाबाद गावात एका मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत तो रात्रभर वडिलांच्या मृतदेहासोबत झोपला. पण एखाद्या मुलाने, पतीने, पत्नीने, महिलेने किंवा पुरूषाने असं घृणास्पद कृत्य केल्याची ही पहिलीच घटना नाही. अशातच, हत्येनंतर मृतदेहासोबत झोपणाऱ्या लोकांची मानसिक स्थिती नेमकी काय असते? असा प्रश्न उद्भवतो.
प्रेयसीच्या हत्येनंतर 2 दिवस मृतदेहासोबत झोपला
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 29 वर्षीय रितिका सेनची तिचा लिव्ह इन पार्टनर सचिन राजपूतने गळा दाबून हत्या केल्याची बातमी समोर आली होती. हत्येनंतर आरोपी मृतदेह चादरीत गुंडाळून बेडवर ठेवला आणि त्यानंतर, दोन दिवस त्याच खोलीत तो मृतदेहासोबत झोपला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: वर्सोवा-वांद्रे सी लिंक बद्दल मोठी अपडेट! काय बदल होणार? वाचा सविस्तर माहिती...
पत्नीच्या हत्येनंतर मृतदेहासोबत दोन तास...
हापूडमध्ये एका दारू पिणाऱ्या पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. हत्येमागचं कारण हेच होतं की घरगुती वादामुळे पत्नीला मुलांसह तिच्या आईवडिलांच्या घरी जायचं असल्याचं तिने पतीला सांगितलं. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी जवळपास दोन तास मृतदेहाजवळ पडून राहिला आणि स्वत: पोलिसांना फोन करून आपला गुन्हा कबूल केला.
मृतदेहासोबत का झोपण्यामागचं नेमकं कारण काय?
काही लोक हत्येनंतर मृतदेहासोबत झोपतात किंवा त्याच्यासोबत वेळ घालवतात. त्यांची मानसिक स्थिती खूप गोंधळलेली आणि असामान्य असते. अशा स्थितीला मानसशास्त्रात नेक्रोफिलिया म्हणतात. या स्थितीत मृत शरीरांबद्दल लैंगिक आकर्षण किंवा आसक्ती वाटते. असे लोक सामान्य लोकांपेक्षा वेगळे असतात.
हे ही वाचा: जेवणात वाढली विषारी मशरूमची भाजी! सूनेने सासू-सासऱ्यांसोबत तिघांना सुद्धा... आता 33 वर्षांची शिक्षा अन्...
काय आहे नेक्रोफिलिया?
नेक्रोफिलिया हा एक दुर्मिळ मानसिक आजार आहे. यामध्ये, एखाद्या व्यक्तीला जिवंत लोकांपेक्षा मृत शरीरांमध्ये जास्त रस असतो कारण त्यात कोणताही संघर्ष किंवा भावनिक गुंतणं नसतं. मानसशास्त्रज्ञांच्या मते, असे लोक बहुतेकदा मनोरुग्ण किंवा अँटी-सोशल पर्सनॅलिटी डिसॉर्डर म्हणजेच असामाजिक व्यक्तिमत्व विकाराने ग्रस्त असतात. मनोरुग्णांमध्ये सहानुभूतीचा अभाव असतो, म्हणजेच त्यांना इतरांचं दुःख जाणवत नाही. त्यामुळे, त्यांना हत्येनंतरही त्यांना पश्चात्ताप होत नाही. ते मृतदेहाला त्यांच्या एका प्रकारची वस्तू मानतात. काही प्रकरणांमध्ये, बालपणातील आघात, जसे की छळ किंवा एकटेपणा, या स्थितीला कारणीभूत ठरतात. ते एकटेपणा टाळण्यासाठी मृत शरीरासोबत राहतात, कारण मृत व्यक्ती कधीही सोडून जात नाही. अशा लोकांवर उपचार करणे कठीण असते, परंतु थेरपी आणि औषधे मदतशीर ठरू शकतात.