मुंबईची खबर: वर्सोवा-वांद्रे सी लिंक बद्दल मोठी अपडेट! काय बदल होणार? वाचा सविस्तर माहिती...
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे बांधल्या जाणाऱ्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वर्सोवा-वांद्रे सी लिंक बद्दल मोठी अपडेट!
काय बदल होणार?
Mumbai News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे बांधल्या जाणाऱ्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता या प्रोजेक्टची किंमत 6788 कोटी रुपयांनी वाढली असल्याचं सांगण्यात येत आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार, काही कनेक्टर्सची लांबी बदलून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. प्रत्यक्ष बांधकाम खर्चात 3900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
पश्चिम महामार्गावरील ताण कमी करण्यासाठी आणि दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई जलद गतीने पोहोचण्यासाठी एमएसआरडीसीने या समुद्री पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. सध्या समुद्रात खांब बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. पुलाच्या सध्याच्या मूळ रचनेनुसार, जुहू आणि वर्सोवा जंक्शनवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांनी त्यात बदल आणि सुधारणा करण्याची मागणी केली होती.
नुकतंच, केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या पथकाने पुलाची प्रत्यक्ष तपासणी केली. यामध्ये, या पुलाला जोडणाऱ्या सर्व जंक्शनवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, मार्गात बदल सुचवण्यात आला आहे. तसेच, पुलाच्या जुहू आणि वर्सोवा कनेक्टरना पश्चिम एक्सप्रेसवे मार्गाशी जोडण्याची गरजही समोर आली आहे. यासाठी या पुलात महत्त्वाचे बदल केले जातील. खर्चात वाढ होण्याचे हे कारण आहे.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत ऑफिसर व्हायचंय? मग RBI च्या 'या' भरतीची माहिती वाचाच अन् लवकरच अर्ज करा...
पुलाच्या दोन भागांना ट्रान्सफर
या संदर्भात एमएसआरडीसीने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीजेडएमए) कडे अर्ज केला होता. त्यानुसार, या पुलाच्या दोन भागांना ट्रान्सफर केलं जाईल आणि एका भागाची लांबी 100 वरून 110 मीटरपर्यंत वाढवली जाईल. जुहू कनेक्टरची लांबी 3.54 किमी वरून 4.45 किमी पर्यंत वाढवली जाईल. यासाठी पुलावर 120 मीटर लांबीचे दोन अतिरिक्त भाग जोडावे लागतील. तसेच, समुद्राकडे पाणी साचू नये म्हणून जुहू कनेक्टरवर खांबांऐवजी केबल-आधारित पूलाचं बांधकाम केलं जाईल.
