'आरक्षण न मिळाल्यास पुढचा काळ लेकरांसाठी...' विष प्राशन करत आणखी एका मराठा बांधवाकडून टोकाचं पाऊल

Maratha Reservation Suicide : बीड तालुक्यातील धानोरा येथील संतोष अर्जुन वळे (वय 39) यांनी आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून औषध प्राशन करत आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

committed suicide over maratha reservation
committed suicide over maratha reservation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला

point

ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये मोठा संताप

point

आरक्षणाच्या मुद्दयावर अनेकांच्या आत्महत्या

point

बीडमध्ये मराठा बांधवाने संपवलं जीवन

Maratha Reservation Suicide : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला दिसून येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये मोठा संताप उसळला आहे. अनेकदा याला राजकीय रंग दिल्याचं काहीजण म्हणतात. याच आरक्षणाच्या मुद्दयावर अनेकांनी आत्महत्या करत आपला जीवही गमावला. अशातच आता बीड तालुक्यातील धानोरा येथील संतोष अर्जुन वळे (वय 39) यांनी आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून औषध प्राशन करत आत्महत्या केली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : बीड ! लेक करत होती पोलीस भरतीची तयारी, ओबीसी आरक्षण गेल्यानं वडिलांना आलं नैराश्य, नंतर टोकाचं पाऊल उचलत...

'आरक्षण न मिळाल्यास पुढचा काळ अवघड'

संतोष वळे हे गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते. शेतकरी कुटुंबातून आलेले वळे यांना आपल्या मुला बाळांच्या भविष्याची काळजी होती. दोन्ही मुलांचे शिक्षिण सुरू असून अशा परिस्थितीत आरक्षण न मिळाल्यास पुढचा काळ अवघड होईल, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली होती, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते.

विष प्राशन करत संपवलं जीवन

दरम्यान, 2 ,सप्टेंबर रोजी त्याने आपल्या घरी विषाचे औषध आणून विष प्राशन केले. त्यानंतर तातडीने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरू असताना शुक्रवारी संतोष वळे यांनी अंतिम श्वास घेत जीवन संपवलं. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी, दोन लहान मुलं, भाऊ, आई-वडील असा त्यांचं कुटुंब आहे. दरम्यान, संतोष वळेंच्या जाण्याने आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.

हे ही वाचा : 6 वर्षाच्या मुलाच्या छातीला अन् प्रायव्हेट पार्टला हात लावत.... 32 वर्षीय तरुणाचं हैवानी कृत्य, नेमकं काय केलं?

मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता; मात्र शेवटी ते नैराश्यात गेले आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलत औषध प्राशन करत जीवन संपवलं. या घटनेनं बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp