पत्नीचा मृत्यू, पती अचानक बेपत्ता... 24 तासांनंतर समोर आलं 'ते' भयानक सत्य!
पतीने कौटुंबिक वादातून पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि आरोपी पती घटनास्थळावरून पळून गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बेडवर पत्नीचा मृतदेह सापडला अन् पती बेपत्ता...

24 तासांनंतर समोर आलं 'ते' भयानक सत्य!
Crime News: राजस्थानच्या हनुमानगढ शहरातील सूर्य नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. येथे पतीने कौटुंबिक वादातून पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केली आणि आरोपी पती घटनास्थळावरून पळून गेला. मृत महिलेचं पूजा असल्याची माहिती समोर आली. तसेच, आरोपी पती वीरेंद्र हा महामंडळात लिपिक म्हणून काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी (9 सप्टेंबर) सकाळी ऑफिसमध्ये न पोहोचल्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीरेंद्रशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आरोपीचा फोन बंद असल्याचं आढळलं तेव्हा अधिकारी त्याच्या घरी पोहोचले आणि तिथे म्हणजेच आरोपीची पत्नी पूजाचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला.
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
तीन वर्षांपूर्वी वीरेंद्र आणि पूजाचं लग्न झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं. कुटुंबियांच्या मते, बऱ्याच दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू होते. प्राथमिक तपासात पोलिसांनी कौटुंबिक वाद हे हत्येचे कारण मानलं आहे. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पुढील तपासानंतर हत्येचे खरं कारण समोर येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांनो! पनवेलला आता सुसाट पोहोचणार... 'या' दोन रेल्वे स्थानकांपासून सुरु होणार नवा रेल्वे रूट
पोलीस टीमने बरेच ठिकाणी छापे...
लग्नाला तीन वर्षे उलटून गेली असल्याने अशा प्रकरणांची कायदेशीर चौकशी डीएसपी पातळीवर केली जाते. सध्या डीएसपी या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. महिला ठाणे पोलिसांनीही गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. वीरेंद्रच्या शोधात पोलीस टीमने बरेच ठिकाणी छापे टाकले. पण अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.
हे ही वाचा: साडे तीन महिन्यांच्या मुलीसोबत वडिलांचं घृणास्पद कृत्य... संतापजनक घटना उघडकीस!
परिसरात दहशत आणि चर्चा...
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आगे. बियाणे महामंडळाचा एक कर्मचारी स्वतःच्या घरात एवढा मोठा गुन्हा करू शकतो, हे पाहून लोकांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक लोकांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, वीरेंद्र आणि पूजा यांच्यातील भांडणाचे आवाज यापूर्वीही अनेकदा ऐकू आले होते. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.