साडे तीन महिन्यांच्या मुलीसोबत वडिलांचं घृणास्पद कृत्य... संतापजनक घटना उघडकीस!
राजस्थानातील चित्तोडगढ जिल्ह्यात केवळ साडे तीन महिन्यांच्या निष्पाप मुलीसोबत तिच्या वडिलांनी घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडिलांनी क्रूरतेच्या मर्यादाच ओलांडल्या

साडे तीन महिन्यांच्या मुलीसोबत वडिलांचं घृणास्पद कृत्य...
Crime News: राजस्थानातील चित्तोडगढ जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ साडे तीन महिन्यांच्या निष्पाप मुलीसोबत तिच्या वडिलांनी घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या आईने यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. प्राथमिक उपचारानंतर पीडित मुलीला उदयपुर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोणतंही सार्वजनिक विधान नाही...
अद्याप पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात कोणतंही सार्वजनिक विधान केलेलं नाही. त्यांच्या मते, मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर प्रकरण स्पष्ट होईल आणि त्यावेळी सगळ्या घटनेची माहिती देण्यात येईल. वडिलांवरील आरोपांच्या तपासात मजबूत पुरावे गोळा करता यावेत म्हणून एफएसएल टीमने मुलीच्या घरी पोहोचून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांनो! पनवेलला आता सुसाट पोहोचणार... 'या' दोन रेल्वे स्थानकांपासून सुरु होणार नवा रेल्वे रूट
पोलिसांचं आवाहन
प्रशासन आणि पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, असं आवाहन केले आहे. पीडित आणि कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर करा. तसेच, कोणतीही माहिती सार्वजनिक केल्याने तपासावर परिणाम होऊ शकतो आणि पीडितेच्या कुटुंबियांचं आणखी नुकसान होऊ शकतं. जर कोणाकडे काही संबंधित माहिती असेल तर त्यांनी राष्ट्रीय बाल हेल्पलाइन 1098 किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, अशी पोलिसांकडून विनंती करण्यात आली आहे.
हे ही वाचा: "बागेत चल नाहीतर व्हिडीओ व्हायरल..." तरुणांनी मुलीसोबत केलं अश्लील कृत्य अन् पीडितेच्या मित्राला सुद्धा...
महाराष्ट्रातील धक्कादायक घटना...
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुद्धा एका 40 वर्षीय वडिलांनी आपल्याच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर वडिलांच्या या घृणास्पद कृत्यामुळे पीडिता गरोदर राहिली. संबंधित घटना गंगापुर पोलीस स्टेशन परिसरातील शिवाजीनगर येथील असल्याची माहिती आहे.