बहिणीचे प्रेमसंबंध कळताच भाऊ संतापला! प्रियकराला दांडक्याने बेदम मारहाण पण शेवटी... मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबईतील मालवणी परिसरात एका 21 वर्षीय आशीष शेट्टी नावाच्या तरुणाने आपल्या बहिणीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बहिणीचे प्रेमसंबंध कळताच भावाचं संतापजनक कृत्य...
प्रियकराला दांडक्याने बेदम मारहाण अन् शेवटी
मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime: मुंबईतील मालवणी परिसरात धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. येथे एका 21 वर्षीय आशीष शेट्टी नावाच्या तरुणाने आपल्या बहिणीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे.
घटनेतील मृत तरुणाचं नाव नितिन सोलंकी असून तो एका रुग्णालयात केअरटेकर म्हणून काम करत होता. आरोपी आशीषची बहीण नितिनची जवळची नातलग होती. सुरुवातीला आशीषने त्याच्या बहिणीच्या प्रेमसंबंधाकडे दुर्लक्ष केलं. परंतु, काही दिवसांपूर्वी नितिन आशीषची आई आणि बहिणीच्या बाबतीत अपमानास्पद बोलला. याच गोष्टीमुळे आशीषला खूप वाईट वाटलं आणि तो त्याच्या बहिणीच्या प्रियकरावर अतिशय संतापला. त्यावेळी त्याने नितिनचा काटा काढण्याचं ठरवलं.
हत्येपूर्वी पाजली दारू...
शनिवारी रात्री सुमारे 10:30 वाजता जोगेश्वरी परिसरात आशीषची नितिनसोबत भेट झाली. दोघांनी एकत्र बसून मद्यपान केलं. त्यावेळी आशीषच्या मनात नेमकं काय चाललंय, याची नितिला काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी, आशीष नितिनला मालवणीच्या कोळीवाडा परिसरात घेऊन गेला. त्यानंतर, ते कृष्ण आश्रमातील एका खोलीत पोहोचले.
हे ही वाचा: दुसऱ्याच पुरुषासोबत होते अनैतिक संबंध! पतीला पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...
दांडक्याने मारहाण करत हत्या...
खोलीत पोहोचल्यानंतर, आशीषचा राग अनावर झाला. त्याने नितिनवर दांडक्याने कित्येक वार केले. यातून नितिन वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण अतिशय निर्दयपणे मारहाण केल्याने पीडित नितिन गंभीर पद्धतीने जखमी झाला. त्यावेळी नितिनच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.










