दुसऱ्याच पुरुषासोबत होते अनैतिक संबंध! पतीला पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...

आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात एका गोल्ला अहोबिलम नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

पतीला पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...
पतीला पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दुसऱ्याच पुरुषासोबत होते पत्नीचे अनैतिक संबंध!

point

पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...

Extra Marital Affair: आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका गोल्ला अहोबिलम नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील असपारी मंडळाच्या दोडागुंडा आणि थोगरगल्लू गावांदरम्यान गोल्ला अहोबिलमची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. असपारी पोलीस या हत्या प्रकरणाचा तपास करत होते. संबंधित घटना 3 सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला असून पीडित तरुणाची हत्या त्याची पत्नी गंगावतीच्या प्रियकराने केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपीचं नाव बसप्पा असल्याचं सांगितलं जात आहे. अहोबिलम दोन वर्षांपासून त्याच्या कुटुंबासह कर्नाटक येथे यादगिरी जिल्ह्यातील वाडिगेरी तालुक्यामध्ये रत्नाडिगी गावात राहात होता. 

पत्नीचे दुसऱ्याच पुरुषासोबत संबंध

अहोबिलमची पत्नी गंगावतीचे त्याच रत्नाडिगी गावात राहणाऱ्या बसप्पासोबत अनैतिक संबंध सुरू झाले. अहोबिलमला त्याच्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर दोघांमध्ये बऱ्याचदा वाद झाले. त्यानंतर, अहोबिलम आपल्या पत्नीला घेऊन त्याच्या मूळ थोगरगल्लू गावी परत आला. गावी परत गेल्यानंतर सुद्धा गंगावतीचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध सुरूच होते. दोघेही दिवसातून बराच काळ फोनवर बोलत असायचे. 

हे ही वाचा: नाल्यात नग्न अवस्थेत सापडला 10 वर्षांच्या मुलीचा मृतदेह! पीडितेसोबत घृणास्पद कृत्य अन् नंतर...

यादरम्यान, बसप्पाने अहोबिलमच्या हत्येचा कट रचला. एके दिवशी, गंगावतीने तिचा पती कलापरी गावात गेल्याचं तिच्या प्रियकराला सांगितलं. तिथून तो जेवून झाल्यानंतर त्याच्या गावी थोगरगल्लूला जाणार असल्याचं देखील गंगावतीने सांगितलं. योजनेनुसार, बसप्पा बाईकवरून कर्नाटकहून असपारीला गेला आणि तिथे राहिला. 

हे ही वाचा: वैवाहित जीवनात सतत अडचणी, त्याच वेळी सोशल मीडियावर झाली मांत्रिकाशी ओळख अन् नको ते घडलं...

धारदार शस्त्राने केली हत्या...

त्यानंतर, बसप्पा 3 सप्टेंबरच्या रात्री थोगरगल्लू गावाच्या दिशेने बाईकवरून जात होता. अहोबिलम सुद्धा त्याच्या मोटारसायकलवरून त्याच्या कामासाठी जात होता. त्यावेळी वाटेतच बसप्पाने अहोबिलमला थांबवलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी बसप्पा घटनास्थळावरून फरार झाला. सध्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp