नाल्यात नग्न अवस्थेत सापडला 10 वर्षांच्या मुलीचा मृतदेह! पीडितेसोबत घृणास्पद कृत्य अन् नंतर...
ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातील श्यामसुंदरपुर गावात रविवारी (7 सप्टेंबर) नाल्यात एका 10 वर्षांच्या मुलीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. अल्पवयीन पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नाल्यात नग्न अवस्थेत सापडला 10 वर्षांच्या मुलीचा मृतदेह!

पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
Crime News: ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातील श्यामसुंदरपुर गावात रविवारी (7 सप्टेंबर) नाल्यात एका 10 वर्षांच्या मुलीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. अल्पवयीन पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी पाचवी इयत्तेत शिकत होती. शनिवारी संध्याकाळी घराबाहेर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. त्यावेळी मुलगी शेजारी किंवा नातेवाईकांच्या घरी गेली असल्याचं कुटुंबियांना वाटलं. पण, रात्री उशीरापर्यंत तिचा काहीच पत्ता न लागल्याने घरच्या लोकांना चिंता वाटू लागली. त्या रात्री पीडितेचा नातेवाईक आणि गावकरी टॉर्च घेऊन मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. अखेर, कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
नाल्यात नग्न अवस्थेत सापडला मृतदेह
रविवारी सकाळी गावात धक्कादायक बातमी कळाल्याने एकच खळबळ उडाली. नाल्यात नग्न अवस्थेत एका 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. पीडितेचे कुटुंबीय तिथे पोहचताच त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. अल्पवयीन पीडितेच्या शरीरावर खोल जखमांच्या खुणा होत्या. तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर इतक्या जखमा होत्या की तिची ओळख पटवणंही कठीण होते. हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या अल्पवयीन मुलीसोबत कोणीतरी घृणास्पद कृत्य करून आरोपींनी तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा गावकऱ्यांनी संशय व्यक्त केला.
हे ही वाचा: पत्नीने चहामध्ये मादक पदार्थ मिसळून प्यायला दिलं अन् भाच्याने केला हल्ला, तब्बल 10 महिन्यांनंतर...
रस्त्यावर उतरून निषेध
या घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी गुन्हेगारांना तात्काळ पकडून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. घटनेची माहिती मिळताच अंगुलचे एसपी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक आणि श्वान पथक देखील होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि प्रकरणाचा तपास सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात 'अनैसर्गिक मृत्यू' (क्रमांक 14/2025) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: वैवाहित जीवनात सतत अडचणी, त्याच वेळी सोशल मीडियावर झाली मांत्रिकाशी ओळख अन् नको ते घडलं...
प्रकरणाचा तपास सुरू
पोलिसांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि आरोपींना लवकरच ताब्यात घेतलं जाणार असल्याचं आश्वासन दिलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतर घटनेचं खरं कारण समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस सध्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याची माहिती आहे.