तरुण तोंडाला मुसक्या बांधून थेट रुग्णालयातच घसले, नंतर तोडफोड करत डॉक्टरांना 6 सेकंदात 11 वेळा...
crime news : काही तरुणांनी एका रुग्णालयात प्रवेश करत तोडफोड केली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला देखील केला होता. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी एरा डॉक्टरांना सहा सेकंदात तब्बल 11 वेळा मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणांनी रुग्णालयात प्रवेश करत तोडफोड

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला

6 सेकंदात 11 वेळा मारहाण

नेमकं प्रकरण काय?
crime news : काही तरुणांनी एका रुग्णालयात प्रवेश करत तोडफोड केली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला देखील केला होता. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी एरा डॉक्टरांना सहा सेकंदात तब्बल 11 वेळा मारहाण केली. त्यांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या, डॉक्टने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. ही घटना झाशीतील नवाबाद भागातील संजीवनी नावाच्या एका खासही रुग्णालयात घडली होती.
हे ही वाचा : Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!
रुग्णावर उपचार करताना धक्कादायक प्रकार
डॉक्टर मनदीप रुग्णावर उपचार करताना हा धक्कादायक प्रकार घडला होता. 6 सप्टेंबर रोजी कमलेश देवी नावाच्या रुग्णाची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा रुग्णाचा मुलगा शिवदीप सिंग हा उपचारावर समाधानी नव्हता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं. यामुळे घटनास्थळी गदारोळ माजला. तेव्हा पोलिसांनी त्या रुग्णाला अनेकदा शांतही केले.
काळे मास्क परिधान करून तरुणांचा हल्ला
रुग्णाला डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यात आला. पण काही वेळानंतर चेहऱ्याला काळे मास्क परिधान करून काही लोक रुग्णालयात आले. तेव्हा ते थेट डॉक्टर मनदीप यांच्या कामाच्या ठिकाणी शिरले आणि त्यांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी काचा फोड़ून हल्ला देखील केला. पण रुग्णालयातील कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी डॉक्टकांना वाचवले.
हे ही वाचा : ठाण्यात एकाच कुटुंबातील सदस्यांनी चिकनसह, अंडी आणि वडापाव खाल्ले, पाचही जणांच्या प्रकृतीत बिघाड, नंतर तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
या झालेल्या एकूण गोंधळात हल्लेखोरांनी मारहाण केली आणि ते धमकी देऊन घटनास्थळावरून पळून गेले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. त्या सीसीटीव्हीत एकूण गुन्हेगार दिसून येत आहेत.