जेवणात वाढली विषारी मशरूमची भाजी! सूनेने सासू-सासऱ्यांसोबत तिघांना सुद्धा... आता 33 वर्षांची शिक्षा अन्...
एका महिलेने मशरूमच्या साहाय्याने तिचे सासू, सासरे आणि नणंदेचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. आता न्यायालयात तिच्या गुन्ह्यांचं प्रकरण पोहोचलं असून महिलेला तीन खून केल्याबद्दल 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सूनेने वाढलेली मशरूमची भाजी ठरली जीवघेणी...

महिलेला 33 वर्षांची शिक्षा अन्... नेमकं प्रकरण काय?
Crime News: खरंच, मशरूम खाल्ल्याने कोणाचा जीव जाऊ शकतो? एका महिलेने मशरूमच्या साहाय्याने तिचे सासू, सासरे आणि नणंदेचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने पती या सगळ्यातून वाचला. आता न्यायालयात तिच्या गुन्ह्यांचं प्रकरण पोहोचलं असून महिलेला तीन खून केल्याबद्दल 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही घटना ऑस्ट्रेलियामधील असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास 50 वर्षांच्या एरिन पॅटरसन नावाच्या महिलेला 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संबंधित महिलेने सासरच्या मंडळींचा विश्वासघात केला आणि त्यांच्याविरोधात कट रचून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
जेवणाच्या बहाण्याने बोलवलं अन्...
हे प्रकरण जुलै 2023 मधील असल्याची माहिती आहे. पॅटरसनने तिचा एक्स म्हणजेच आधीचा पती सिमोन पॅटरसन आणि अंकल आंटीला दुपारी जेवणासाठी बोलवलं होतं. त्या महिलेने तिला कॅन्सर झाल्याचं खोटं कारण सांगितलं आणि तिला हे तिच्या दोन मुलांसोबत कसे सांगायचे हे माहित नसून तिला यावर सर्वांचा सल्ला घ्यायचा असल्याचं तिने सांगितलं. नात्याने तिचे सासरे लागणारे डॉन पॅटरसन यांना एरिनबद्दल ही बातमी कळताच ते भावुक झाले. त्यांच्या आधीच्या सुनेला कठीण काळात आधार देण्यासाठी ते दुपारच्या जेवणासाठी तिथे पोहोचले. त्यांनी त्यांची पत्नी गेल पॅटरसन आणि त्यांची बहीण हीथर विल्किन्सन यांनाही सोबत घेतलं.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत ऑफिसर व्हायचंय? मग RBI च्या 'या' भरतीची माहिती वाचाच अन् लवकरच अर्ज करा...
जेवणात विषारी मशरूम...
एरिन पॅटरसनने रचलेल्या भयानक कटाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. तिच्या नातेवाईकांना तिच्या मनात काय चालले आहे, याची काहीच कल्पना नव्हती. तिने जेवणासाठी अत्यंत विषारी असलेले डेथ कॅप मशरूम बनवले होते. एरिनने वेगवेगळ्या प्लॅट्समध्ये जेवण वाढलं. तिने स्वतःच्या प्लेटमध्ये सामान्य मशरूम्सची भाजी वाढली आणि इतर सर्वांना प्लेटमध्ये विषारी मशरूम वाढले. तिघांनी मशरूम खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडू लागली.
हे ही वाचा: दुसऱ्याच पुरुषासोबत होते अनैतिक संबंध! पतीला पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...
या प्रकरणात पोलिसांकडून एरिनला नोव्हेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, तिने तिच्यावरील आरोपांना स्पष्ट नकार दिला होता. मशरूम खाल्ल्याने पीडितांची तब्येत खालावली असल्याचं आरोपी एरिनने सांगितलं नव्हतं आणि यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय वाढत गेला. त्यानंतर, तिने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला. तीन लोकांची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने एरिनला 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2023 मध्ये हे प्रकरण अतिशय चर्चेत होतं. या केसला मशरूम मर्डर नावाने देखील संबोधलं गेलं.