Ayush Komkar Murder: पुण्यात दहशत माजवली, नातवाची हत्या.. आरोपी बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसवलं, पाहा पोलिसांनी केलं तरी काय!

Pune Bandu Andekar Arrest: पुण्यातील आयुष कोमकर याच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याच आजोबाला म्हणजे बंडू आंदेकर याला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

ayush komkar murder case terror spread in pune grandson murder accused bandu andekar was made to kneel look what the police did
आयुष कोमकर हत्या प्रकरण: बंडू आंदेकरला अटक
social share
google news

आदित्य भवार, पुणे: पुण्यातील आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. 5 सप्टेंबर रोजी लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील पार्किंगमध्ये दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रं फिरवली आणि 8 आरोपींना अटक केली. ज्यामध्ये गोळ्या झाडणारे आणि आरोपींना मदत करणारे अशा सर्वांना अटक केली आहे. यासोबतच मुख्य आरोपी आणि आयुषचे आजोबा असलेल्या बंडू अण्णा आंदेकर याला देखील अटक करण्यात आलं आहे. 

नेमकी घटना काय?

5 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. जिथे आयुष कोमकर राहत होता. त्याच्यावर मारेकऱ्यांनी 10 ते 12 राऊंड फायर केले होते. त्यापैकी 9 गोळ्या या आयुषला लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा>> Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!

या हत्येतील यश पाटील,अमित पाटोळे, सुजल मेरगु, अमन युसुफ पठाण या आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली. तर बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर यांना बुलढाण्यातून अटक करण्यात आली.

दरम्यान, अद्यापही 3 आरोपी हे फरार आहेत. ज्यामध्ये कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर आणि इतर आरोपींचाही समावश आहे. 

'तिथून' आरोपी निसटले अन् काही दिवसात आयुष कोमकरला संपवलं

आयुषच्या हत्येसाठी मागील काही दिवसांपासून सातत्याने रेकी सुरू होती. याशिवाय भारतीय विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार येथे सोमा गायकवाड याच्या हत्येसाठी रेकी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी आधीच एका आरोपीला अटक केल्याने हा कट उधळला गेला होता. याच प्रकरणातील FIR मध्ये त्याच 5 आरोपींची नावं होती ज्यांनी आयुष कोमकरची हत्या केली.

हे ही वाचा>> Pune: पोराचे अंत्यसंस्कार थांबवले, वडील गणेश कोमकरला जेलमधून आणलं तेव्हाच दिला अग्नी.. स्मशानभूमीत नेमकं काय घडलं?

पोलिसांमुळे कट उधळला गेल्याने सर्व आरोपी हे फरार झाले. पोलीस या आरोपींना अटक करू शकले नाही. त्यामुळे त्यांना आयुष कोमकरची हत्या करण्याची संधी मिळाली. 

आरोपी बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसवलं... 

पुण्यात गँगवॉरमुळे सध्या दहशतीचं वातावरण आहे. अशावेळी आता पुणे पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगवान कारवाई करत 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

यावेळी पोलिसांनी या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बंडू आंदेकर याला तात्काळ अटक केली. एवढंच नव्हे तर त्याला अक्षरश: गुडघ्यावर खाली बसायलाही लावलं. 

बंडू आंदेकर याची पुण्यात बरीच दहशत होती. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल होते. मात्र, आता स्वत:च्याच नातवाच्या हत्या प्रकरणात तो प्रमुख आरोपी आहे. अशावेळी पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं. पण त्याआधी त्याला मीडियासमोर आणत पोलिसांनी गुडघ्यावर बसण्यास भाग पाडलं.

दरम्यान, पोलिसांनी आपल्या या कृतीतून पुण्यात टोळ्यांना एक स्पष्ट मेसेज दिला आहे. त्यामुळे यापुढे गँगवॉरबाबत पोलीस अधिक कठोर भूमिका घेतील अशी चर्चा आता पुणेकरांमध्ये सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp