तरुणींचे अश्लील Video बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा..पीडितेच्या वडिलांनी आरोपीला पकडलं अन् मोबाईलमध्ये सापडल्या घाणेरड्या क्लिप्स

Today Shocking Viral News :  कानपूरच्या नौबस्ता परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा अश्लील व्हिडोओ बनवून तिला ब्लॅकमेल करत होता.

ADVERTISEMENT

Today Shocking Viral News
Today Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

त्या तरुणाने मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवले अन् नंतर..

point

एका मुलीच्या वडिलांनी आरोपीला पकडलं

point

आरोपी तरुणाच्या मोबाईलमध्ये काय सापडलं?

Today Shocking Viral News :  कानपूरच्या नौबस्ता परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा अश्लील व्हिडोओ बनवून तिला ब्लॅकमेल करत होता. विद्यार्थीनीने घडलेला धक्कादायक प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तरुणाला पकडलं आणि मोबाईल तपासला, तेव्हा त्याला 15-20 तरुणींचे अश्लील व्हिडीओ त्या मोबाईलमध्ये सापडले. 

तसच त्या तरुणाचं मोबाईल तपासलं असता, त्यामध्ये काही ऑडिओ क्लिपही मिळाल्या आहेत. या ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली. आरोपी मुलींना ब्लॅकमेल करून दुसऱ्या लोकांशी त्याचा सौदा करायचा, अशी माहिती समोर आली. त्यानंतर आरोपी फरार झाला. पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल करून मोबाईल पोलिसांकडे सोपवला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. केशव उत्तम असं आरोपीचं नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपी केशव उत्तम अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्याच्या प्रेमप्रकरणाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवायचा. त्यानंतर तो व्हिडीओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. आरोपी दुसऱ्या तरुणांना संबंध करण्यासाठी सांगायचा. दुसऱ्या तरुणांना मुली पाठवण्याच्या बहाण्याने तो पैसे उकळायचा. याप्रकरणात अनेक मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत. 

हे ही वाचा >> Thackeray Brother: उद्धव ठाकरे 'या' नेत्याला सोबत घेऊन अचानक का गेले राज ठाकरेंच्या घरी?, 'शिवतीर्थ'वर बंद दाराआड कोणत्या चर्चा?

कानपूरच्या नौबस्ता परिसरात राहणाऱ्या एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला केशव उत्तम खूप त्रास द्यायचा. 1 ऑक्टोबरला पीडित मुलीच्या वडिलांना खबर मिळाली की, त्याच्या मुलीजवळ दोन तरुण थांबले आहेत. मुलीचे वडील कुटुंबियांसोबत त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या मुलांना पकडलं. त्यानंतर त्यांना समजलं की, केशव उत्तमने त्यांच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवला आहे. 

हे ही वाचा >> बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...

हे वाचलं का?

    follow whatsapp