Maharashtra Weather: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, विजांच्या गडकडाटासह वरूणराजा कोकणात घलणार थैमान
Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रात उद्या 9 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभाग IMD नुसार अंदाज

नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन
Mharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार राज्यात 9 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात आणि इतर काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता आहे. मुंबईसह कोकणात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान विभागाने सल्ला दिला आहे.
हे ही वाचा : मुलाने आईकडे केली 40 रुपयांची मागणी, आईनं पैसे देण्यास दिला नकार, नंतर लेकानं आईवर विटेनं हल्ला करत....
कोकण विभाग :
कोकणातील पालघर, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. तसेच रायगडमध्ये मुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. तसेच कमाल तापमान हे 43 अंश राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 25 अंश सेल्सिअस राहिल असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरील परिसरातील भागात पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. पुणे विभागात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुणे आणि कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : वडिलांना 'त्या' एका गोष्टीचा होता लेकीवर राग, नंतर नातीसह लेकीवर कोयत्याने केले सपावप वार ...
विदर्भ आणि मराठवाडा :
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि चंद्रपूरमध्ये वीजांसह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून पावसाची तीव्रता कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.