महिला प्रियकरासोबत घरात नको ते करत होती..6 वर्षाच्या मुलीनं पाहिलं, घाबरलेल्या महिलेनं मुलीचा गळा दाबला अन् घडलं..

Today Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. सिकंदराराऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी 35 वर्षीय महिला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती.

ADVERTISEMENT

Today Shocking Viral News
Today Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

point

मुलीचा मृतेदह विहिरीत फेकला आणि..

point

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना

Today Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. सिकंदराराऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी 35 वर्षीय महिला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. हा धक्कादायक प्रकार तिच्या 6 वर्षीय मुलीने पाहिला. यामुळे महिला घाबरली आणि तिने तिच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून एका विहिरीत फेकला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही धक्कादायक घटना सिकंदराराऊ येथे घडली. येथील एका महिलेवर तिच्या मुलीचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेचं तिच्या गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत अफेअर सुरु होतं. 3 सप्टेंबर रोजी महिलेचा पती आणि तिची सासू एका कामासाठी मथुराला गेले होते. तसच सासराही गावाला निघून गेला होता. हीच संधी साधून महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं. जेव्हा ते दोघे नको त्या अवस्थेत होते, तेव्हा मुलीनं महिलेला पाहिलं. त्यानंतर महिला मुलीवर ओरडली. त्यानंतर मुलीनं तिच्या आईला म्हटलं, हे सर्व मी वडिलांना सांगणार आहे. त्यानंतर घाबरलेल्या महिलेनं गळा दाबून मुलीची हत्या केली.

हे ही वाचा >> 'तो छातीला स्पर्श करत होता..', महिला भर रस्त्यात बाईक ड्रायव्हरला भिडली..लोकांची गर्दी जमली अन्...Video तुफान व्हायरल!

मुलीचा मृतेदह विहिरीत फेकला आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर महिलेनं मृतदेह पोत्यात टाकला आणि घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका विहिरीत फेकला. मुलगी घरी दिसली नाही, तेव्हा कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. पण तिचा काही पत्ता लागला नाही. याचदरम्यान, मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याची खबर मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला आणि या घटनेमागचं सत्य समोर आलं. मुलीनं स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेच्या हातावर चावा घेतला होता. पोलिसांनी तो निशाण पाहिल्यावर आरोपीला पडकलं. 

हे ही वाचा >> पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या, सासू-सासऱ्यांवर सुद्धा केला हल्ला अन् स्वत: गळफास घेत... नेमकं कारण काय?

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना

बिहारच्या बांका जिल्ह्यात कौंटुबिक वादविवादातून धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. वाद इतका विकोपाला गेला की, पतीने दुसऱ्या पत्नीसोबत मिळून पहिल्या पत्नीची हत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. सावित्री देवी (34) असं मृत महिलेचं नाव आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp