पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या, सासू-सासऱ्यांवर सुद्धा केला हल्ला अन् स्वत: गळफास घेत... नेमकं कारण काय?

झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात एका 30 वर्षीय तरुणाने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, त्याने वत: गळफास घेत आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या...
पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने वादातून पत्नीची केली हत्या

point

नंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या...

point

नेमकं कारण काय?

Crime News: झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे एका 30 वर्षीय तरुणाने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या सासू- सासऱ्यांना देखील जखमी केलं. त्यानंतर, त्याने वत: गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारच्या रात्री पोडैयाहाट पोलीस स्टेशन हद्दीतील लाठीबाडी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पती आणि पत्नीमधील दारू पिण्यावरून वादातून ही घटना घडली. 

पोडैयाहाट पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सांगितलं की पतीने दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण केली. त्यावेळी पत्नीने या सगळ्याला विरोध केला असता पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये पीडित पत्नीचा मृत्यू झाला. पीडितेच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पतीने त्यांच्यावर सुद्धा चाकूने हल्ला केला. यामध्ये आरोपीचे सासू आणि सासरे गंभीर पद्धतीने जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर, पतीने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

हे ही वाचा:  भाच्याच्या प्रेमात मामी झाली वेडी! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढला अन् मृतदेहाची विल्हेवाट तर...

दारू पिऊन पत्नीला मारहाण

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रकरणातील आरोपी राजेंद्र पंडित आणि त्याची पत्नी रीता देवी याचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच, घटनेत जखमी झालेल्या आरोपीच्या सासू आणि सासऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 6 वर्षांपूर्वी राजेंद्रचं रीता देवीसोबत लग्न झालं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गावऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी पती नेहमी दारूच्या नशेत पीडितेला मारहाण करायचा. 

हे ही वाचा: "माझे पप्पा लहान भावाचे जास्त लाड..." वडिलांवरील रागामुळे मोठा मुलगा नको ते करून बसला अन्...

दारू पिण्याच्या कारणावरून अशीच घटना...

तसेच, झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात एका महिलेने दारू पिण्याच्या कारणावरून पतीसोबत झालेल्या वादातून तिच्या पतीची हत्या केली आणि मृतदेह 10 दिवसांहून अधिक काळ घरात पुरून ठेवल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना टुंडी पोलीस स्टेशन परिसरातील तिलैयातन गावात घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुरजी मझियान नावाच्या एका महिलेने तिच्या पती सुरेश हांसदाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पत्नीने गावातील मातीच्या घरातील एक खोलीत खड्डा खणून मृतदेह पुरला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp