पतीनं पत्नीचं मुंडकं छाटलं! नंतर शरीराचे 17 तुकडे केले अन् वेगवेगळ्या ठिकाणी फेकले...खतरनाक मर्डरमुळे भिवंडी हादरलं!
Bhiwandi Shocking Murder Case : भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ताहा नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारीचा निर्घृण खून केला, असा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीनं पत्नीची केली निर्घृण हत्या
मृतदेहाचे केले 17 तुकडे
पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Bhiwandi Shocking Murder Case : भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ताहा नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारीचा निर्घृण खून केला, असा आरोप आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, हत्येनंतर आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे 17 तुकडे केले आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्टसा इदगहा रोडजवळ स्लॉटर हाऊस परिसरात एका महिलेचं छाटलेलं मुंडकं सापडलं होतं. तपास सुरु झाल्यानंतर पोलिसांना ताहावर संशय आला आणि त्यांनी आरोपी ताहाला अटक केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान, आरोपी ताहा त्याचे जबाब बदलत आहे. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाहीय. पोलिसांचं म्हणणं आहे की, मुस्कानच्या शरीराचे इतर तुकडे शोधण्यासाठी ड्रोन आणि फायर ब्रिगेडची मदत घेतली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर मुस्कानची आई हनीफा खानने पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांचं म्हणणं होतं की, मुलीचा फोन दोन दिवसांपासून बंद होता आणि तिचा जावई ताहाही कॉल उचलत नव्हता. नंतर पोलिसांनी छाटलेल्या मुंडक्याचा फोटो दाखवला, तेव्हा हनिफाने तिच्या मुलीचा मृतदेह असल्याचं स्पष्ट केलं.
हे ही वाचा >> कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?
मृतदेहाचे केले 17 तुकडे
भिवंडीच्या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रतनपारखी यांनी म्हटलं की, आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाहीय की, हत्या नेमकी कुठे करण्यात आली आणि कोणत्या शस्त्राने मृतदेह कापला..तपासाची चक्रे फिरवण्यासाठी डीसीपी आणि एसीपीच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे.









