कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?
कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यात एका 10 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं एक अत्यंत धक्कदायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहेय कोडोली येथील दहा वर्षाच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्यानं, तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला. अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकारानं बळी गेल्यानं, कोडोली आणि परिसरामध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वैभवनगरमध्ये अजित गावडे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. गुरुवारी संध्याकाळी अजित गावडे यांचा दहा वर्षाचा मुलगा, श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता.
हे ही वाचा>> जे घडतंय ते भयंकर.. आठवीतील विद्यार्थ्याने वर्गातल्या मुलावर केले चाकूने वार, कारण...
खेळता खेळता त्याला अचानक त्याला काही तरी त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पळत-पळत घरी गेला. यावेळी त्याने आपल्या आईला सांगितलं की, त्याला काही तरी त्रास होतो आहे. पण असं सांगत असतानचा तो त्याच्या आईच्या कुशीत गेला. ज्यानंतर अवघ्या काही क्षणाच्या आत त्याने आईच्या कुशीमध्येच अखेरचा श्वास घेतला. तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावाच्या श्रावणचा अचानक मृत्यू झाल्यानं, गावडे कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे. अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं होती.










