झुडपात अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह! त्या अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह झुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

झुडपात अर्धनग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

नेमकं काय घडलं?
Crime News: दरवर्षी भारतात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच, अल्पवयीन तरुणींवर होणाऱ्या शारीरिक अत्याचारात वाढ होत असल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात सुद्धा अशीच एक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पीडिता मजूर म्हणून काम करायची
येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह झुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना कडाधाम कोतवाली परिसरातील सोराई बुजुर्ग गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत मृत पावलेली तरुणी येथे मजूर म्हणून काम करत होती.
हे ही वाचा: 65 वर्षांच्या वृद्ध महिलेने पतीवरच केला बलात्काराचा आरोप... पोलिसांना सांगितली सगळी कहाणी!
पैसे घेण्यासाठी गेली होती...
गुरुवारी सकाळी पीडित मुलगी नवाब नावाच्या व्यक्तीच्या घरी पैसे घेण्यासाठी गेली होती. संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही, त्यावेळी कुटुंबातील सदस्य तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले, त्यानंतर गावाबाहेरील झुडपात मुलीचा मृतदेह एका मेंढपाळाला दिसला. मृतदेहाजवळ पीडितेची सायकल पडल्याचं देखील आढळून आलं.
हे ही वाचा: गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली..तरुणाने टेन्शनमध्ये केलं भयंकर कृत्य, अख्ख गाव हादरलं!
पोलिसांचा तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत आणि मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. एसपी राजेश कुमार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृताची ओळख पटल्यानंतर, मुलगी घटनेच्या दिवशी वाटेत कोणाला भेटली आणि ही घटना कोणी घडवली, याचा पोलीस तपास करत आहेत.