नवऱ्याने iphone दिला नाही..संतापलेल्या पत्नीनं पतीला टेरेसवरून ढकललं! नंतर घडली सर्वात भयंकर घटना
Husband And Wife Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये एक आगळावेगळी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एक पतीने पत्नीला आयफोन दिलं नाही, म्हणून पत्नीने पतीला मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीला आयफोनच हवा होता, पतीकडे केला हट्ट अन् नंतर..

शिवमने पत्नीवर केले गंभीर आरोप

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
Husband And Wife Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये एक आगळावेगळी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एक पतीने पत्नीला आयफोन दिलं नाही, म्हणून पत्नीने पतीला मारहाण केली. इतकच नव्हे, तर आरोपी महिलेनं तिच्या पतीला टेरेसवरून धक्का दिला. त्यानंतर पती गंभीर जखमी झाला आणि त्याचा पाय मोडला. पतीने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
ग्वालियरच्या ठाकूर परिसरात राहणारा शिवम वंशकारने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, तो मध्यप्रदेशच्या टीमकगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो ग्वालियरमध्ये राहून खासगी नोकरी करतो. त्याचं लग्न दोन वर्षांपूर्वी झांसी येथे राहणाऱ्या महिलेसोबत झालं होतं. लग्नानंतर महिला तिच्या पतीसमोर अनेक मागण्या ठेवायची.
पत्नीला आयफोनच हवा होता, पतीकडे केला हट्ट अन् नंतर..
पती त्याच्या परिस्थितीनुसार पत्नीच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस पत्नीने पतीकडे आयफोन खरेदी करण्याचा तगादा लावला. साधनाची ही मागणी पूर्ण करणं शिवमसाठी कठीण होतं. त्याने पत्नीच्या मागणीनुसार, नवीन मोबाईल देण्याचं वचन दिलं. पण पत्नीला आयफोनच हवा होता. आयफोन खरेदी करण्याची शिवमची परिस्थिती नव्हती.
हे ही वाचा >> अरुण गवळी मिल कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन.. दाऊदला नडणाऱ्या 'डॅडी'ची खतरनाक कहाणी
शिवमने पत्नीवर केले गंभीर आरोप
त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद झाला. त्यानंतर पत्नीने पतीला शिविगाळ केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर साधनाने शिवमला टेरेसवरून धक्का दिला. शिवम जेव्हा खाली पडला, तेव्हा त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या पाय मोडला. दरम्यान, शिवमने पोलिसांत तक्रार दाखल करत पत्नीवर गंभीर आरोप केले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.