पत्नीचं काकासोबत होतं अफेअर..पती दुबईहून परत आला! दारू पिऊन संबंध केले, नंतर चाकूने सपासप वार केले अन्..
Shocking Murder Case : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात ताजपूर येथे भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उदय आणि त्याची पत्नी रीनाच्या व्हायरल स्टोरीची तुफान चर्चा रंगलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीसोबत संबंध केले, त्यानंतर केली हत्या

पोलिसांनी कसून तपास केला अन् आरोपीला ठोकल्या बेड्या

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Shocking Murder Case : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात ताजपूर येथे भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उदय आणि त्याची पत्नी रीनाच्या व्हायरल स्टोरीची तुफान चर्चा रंगलीय. उदय काबाडकष्ट करणारा व्यक्ती होता. कुटुंबासाठी भरपूर पैसे कमावण्यासाठी तो दुबईला गेला होता. तो तिथे मजुरी करायचा, जेणेकरून रीना तिची 10 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करेल. पण जवळपास 8 महिन्यांपूर्वी एका फोन कॉलने तिच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं.
कारण तो कॉल तिचा चुलत भाऊ विनोदने केला होता. तिने उदयला सांगितलं की, त्याची पत्नी रीनाचा तिच्या काकासोबत अनैतिक संबंध आहे. विनोदने धमकी देत म्हटलं, हे प्रकरण सांभाळा..नाहीतर संपूर्ण कुटुंब संपेल. हे ऐकल्यानंतर उदय तातडीनं दुबईहून समस्तीपूर येथे गेला. गावात छोटे-मोठे काम सुरु केले. कारण रीनावर त्याचा संशय बळावला होता. तो प्रत्येक वेळी रीनावर नजर ठेवायचा. जेव्हा तो रीनाला याबाबत विचारायचा, रीना त्याला नकार द्यायची.
हे ही वाचा >> Maratha Reservation: OBC नाराज, मराठा आरक्षण देऊन भाजप चक्रव्यूहात अडकलं? CM फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल सुरू!
पत्नीसोबत संबंध केले, त्यानंतर केली हत्या
21 ऑगस्टच्या रात्री उदय दारूच्या नशेत घरी आला होता. त्याने रीनाला झोपेच्या बहाण्याने घराच्या छतावर बोलावलं होतं. तिथे त्याने तोच प्रश्न विचारला की, तुझं माझ्या काकासोबत काय सुरु आहे? रिनाने या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. त्यानंतर उदयने रीनासोबत शारीरिक संबंध केले आणि रीना जेव्हा झोपली, त्यानंतर भयंकर घटना घडली.
पोलिसांनी कसून तपास केला अन् आरोपीला ठोकल्या बेड्या
उदयने उशीच्या खाली ठेवलेला चाकू काढला आणि रीनाचा गळा कापला. रीना जखमी झाल्यावर उदयने तिचं तोंड दाबलं आणि हात-पाय पकडून ठेवले. त्यानंतर रीनाचा मृत्यू झाला. उदयने रीनाचा मृतदेह छतावरच सोडला आणि गुपचूप खाली येऊन झोपला. जसं की काही झालंच नाही. परंतु, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर उदयला अटक केली आणि त्याने गुन्हा कबूल केला.