आरारारारा खतरनाक! एका महिलेचे 15 पती..पंजाबहून इंग्लंडला गेले..नंतर समोर आलं हादरंवून टाकणारं ट्वीस्ट, घडलं तरी काय?
Couple Shocking News : पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका व्यक्तीची पत्नी इंग्लंडला राहत होती, म्हणून त्याने इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा बनवायला गेला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेसोबत घडला सर्वात भयंकर प्रकार

पत्नीचे 15 पती इंग्लंडला गेले अन् नवऱ्याला समजलं

पण नंतर आला सर्वात मोठा ट्विस्ट
Couple Shocking News : पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका व्यक्तीची पत्नी इंग्लंडला राहत होती, म्हणून त्याने इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा बनवायला गेला. पण त्याला व्हिसा मिळाला नाही. नंतर त्याला माहित झालं की, त्याच्या पत्नीचे 15 पती आहेत. त्यानंतर त्या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला. या प्रकरणाची सत्यता समोर आल्यानंतर पोलिसही थक्क झाले. कारण पोलिसांना माहित झालं की, महिलेचे 15 पती नाहीयत. तर तिच्या ओळखपत्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करून 15 तरुणांना इंग्लंडला पाठवण्यात आलं होतं. महिलेला तर या गोष्टीबाबत अजिबात माहितच नव्हतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक एका दाम्पत्याने केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या दाम्पत्याविरोधात तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडला राहणाऱ्या त्या महिलेला अटक करण्यात आली होती. पण त्या महिलेचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. महिलेचा खरा पती पंजाबच्या राजपूरा येथे राहतो.
इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या या दाम्पत्याने पीडित व्यक्ती आणि त्याच्या पत्नीच्या कागदपत्रांचा चुकीच्या पद्धतीत वापर करण्यात आला होता. पीडित व्यक्तीने आरोपी दाम्पत्याविरोधात राजपूरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> "पप्पांच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स..." मुलीने सगळ्याच गोष्टीचा केला खुलासा! पतीने का केली पत्नीची हत्या?
मुलासोबत इंग्लंडला जायचं होतं
आलमपूर येथे राहणाऱ्या भिंदर सिंह यांनी म्हटलं की, त्याची पत्नी इंग्लंडमध्ये राहते. भिंदर सिंहच्या मुलासोबत इंग्लंडला जायचं होतं. भिंदर सिंह यांच्या पत्नीने स्पॉन्सरशिप पाठवली होती. भिंदर सिंहने इंग्लंडला जाण्यासाठी इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या दाम्पत्याकडे फाईल पाठवली. आरोपींनी त्यांच्याकडून 5 लाख 90 हजार रपये वसूल केले. पण काही दिवसानंतर त्याला इंग्लंडचा व्हिसा देण्याबाबत नकार दिला.
प्रशांत आणि रुबीचा कारनामा
भिंदर सिंहला धक्का तेव्हा बसला, जेव्हा त्याच्या पत्नीला इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा भिंदरला माहित झालं की,आरोपींनी त्यांच्या कागदपत्रांचा चुकीचा वापर केला आणि 15 तरुणांना तिचा पती बनवून परदेशात पाठवण्यात आलं आहे. इमीग्रेशन कंपनीचा संचालक प्रशांत आणि त्याची पत्नी रुबी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरु केली आहे.