Maharashtra Weather: रायगड, रत्नागिरीसह कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा धुमाकूळ, पाहा कसं असेल हवामान

मुंबई तक

Maharashtra Weather Today : भारतीय हवामान खात्याने (IMD) 4 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

point

4 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर कायम

point

काय सांगतंय हवामानशास्त्र?

Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) 4 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर मान्सूनचा प्रवाह हा हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा :  कुटुंबातील सदस्य झोपले होते गाढ, तरुणीची सटकली अन् थेट वडिलांच्या डोक्यात हातोड्यानं केला हल्ला, 'त्या' रात्री काय घडलं?

कोकण विभाग :

कोकण विभागासह घाटमाथ्यावर हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. कोकण भागातील रत्नागिरी आणि रायगडमध्ये हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, आणि कोल्हापूर येथे हलका ते मध्यम पावसाचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचलं का?