"पप्पांच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स..." मुलीने सगळ्याच गोष्टीचा केला खुलासा! पतीने का केली पत्नीची हत्या?

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पतीकडूनच पत्नी हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर, पीडितेच्या 13 वर्षीय मुलीने वडिलांच्या विरोधात FIR दाखल केला. वडिलांना अटक झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या मुलीने प्रकरणासंबंधी बरेच धक्कादायक खुलासे केले.

ADVERTISEMENT

"पप्पांच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स..." मुलीने सगळ्याच गोष्टीचा केला खुलासा!
"पप्पांच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स..." मुलीने सगळ्याच गोष्टीचा केला खुलासा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने का केली पत्नीची हत्या?

point

मुलीने आणलं सगळं उघडकीस...

Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून बुधवारी (3 सप्टेंबर) एका महिलेच्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पीडित महिला फोटो काढून दुकानातून बाहेर पडल्यानंतर पतीकडूनच तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, पीडितेच्या 13 वर्षीय मुलीने वडिलांच्या विरोधात FIR दाखल केला. वडिलांना अटक झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या मुलीने प्रकरणासंबंधी बरेच धक्कादायक खुलासे केले. 

पती आणि पत्नीमध्ये मतभेद...

संबंधित प्रकरण शाहपूर परिसरातील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षांपूर्वी जेल रोड येथील रहिवासी विश्वकर्मा चौहान याचं ममता नावाच्या 35 वर्षीय महिलेसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही वर्षे सर्व काही ठिक होतं. दोघांना एक मुलगी सुद्धा झाली. मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात मतभेद वाढत गेले. दोघे पती-पत्नी एकमेकांवर अनैतिक संबंधांचा आरोप लावत होते. 14 महिन्यांपूर्वीच ममता तिच्या 13 वर्षांच्या मुलीला घेऊन शाहपूर येथील वाटिका परिसरात भाडे तत्त्वावर घर घेऊन राहत होती. तिथे पीडिता एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. 

हे ही वाचा: पती घरी नसताना पत्नी करायची... पतीला संशय आला अन् 4 मित्रांसोबत मिळून केला गेम, नंतर नदीत सूटकेसमध्ये....

मुलीने केला खुलासा 

कौटुंबिक न्यायालयात विश्वकर्मा आणि ममता यांच्या घटस्फोटाची केस चालत होती. त्यावेळी त्यांच्या मुलीने सांगितलं की "पप्पाचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत आणि मम्मी याच गोष्टीचा विरोध करत होती." विश्वकर्माला त्याच्या पत्नीचा इतका राग होता की त्याने त्याची जमीन विकून एक पिस्तूल खरेदी केली होती. तसेच, ममता सतत पैशांची मागणी करत असल्याचं विश्वाकर्माने सांगितलं. 

आरोपीने केले पत्नीवर आरोप...

विश्वकर्माने असंही सांगितलं की "सहा महिन्यांपूर्वी मी कोर्टाच्या नियोजित तारखेवर गेलो होतो तेव्हा ममताने एका तरुणाला मला मारहाण करण्यास सांगितलं होतं आणि त्यावेळी त्या तरुणाने मला मारहाण केली होती." त्या दिवसापासून विश्वकर्मा त्याच्या पत्नीवर खूप रागावला होता. त्याला आधीच संशय होता की त्याच्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहे आणि मारहाणीनंतर त्याला या सगळ्याची खात्री पटली. 

हे ही वाचा: तीन मेहुण्यांनी मिळून दाजीचे हात-पाय बांधले अन् कारच्या डिक्कीत... फिल्मी स्टाइलने केलं किडनॅप पण...

ममताच्या हत्येनंतर तिच्या 13 वर्षांच्या मुलीने वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या वडिलांचे बऱ्याच तरुणींसोबत अनैतिक संबंध आहेत. या सगळ्याचा ममताने विरोध केला असता तिला तिच्या पतीने त्रास देण्यास सुरूवात केली. सध्या, आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. संबंधित प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp