पती घरी नसताना पत्नी करायची... पतीला संशय आला अन् 4 मित्रांसोबत मिळून केला गेम, नंतर नदीत सूटकेसमध्ये....
लातूर जिल्ह्यात 10 दिवसांपूर्वी तिरु नदीतून एका सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकणासंबंधी पोलिसांनी शोध घेतला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीला पत्नीेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला अन्...

पतीने 4 मित्रांसोबत मिळून केला गेम, नंतर नदीत सूटकेसमध्ये....
Murder Cases: लातूर जिल्ह्यात 10 दिवसांपूर्वी तिरु नदीतून एका सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकणासंबंधी पोलिसांनी शोध घेतला असून मृताच्या पतीसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, हेच हत्येमागचं कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
पतीसह त्याच्या साथीदारांना अटक
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, फरीदा खातून (23) अशी मृत महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच, फरीदाची हत्या केल्याच्या आरोपाखाली तिचा 34 वर्षीय पती जिया-उल-हक उदगीर याच्यासह त्याचे चार साथीदार सज्जाद जरुल अन्सारी (19), अरबाज़ जमलू अन्सारी (19), सकीर इब्राहिम अन्सारी (24) आणि आजम अली उर्फ गुड्डू (19) यांना अटक करण्यात आली आहे.
लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे शेजारील तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा तिच्या पतीला संशय होता. याच रागात त्याने आपल्या चार मित्रांसोबत मिळून पत्नीच्या हत्येचा कट रचला. आरोपी पतीने साथीदाराच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून तो नदीत फेकून दिला.
कसा झाला घटनेचा खुलासा?
24 ऑगस्ट रोजी वाधवाना परिसरात काही शेतकऱ्यांनी चाकूर–शेळगाव फाटा रोडवरील तिरु नदीजवळ उग्रवास येत असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्यांना तिथे एक ट्रॉली बॅग सापडली. ती उघडल्यानंतर त्यामध्ये जवळपास 25 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला.
हे ही वाचा: 2 वर्षांच्या बाळाला 13 व्या मजल्यावरून फेकलं अन् नंतर आईने सुद्धा मारली उडी...
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या पाच वेगवेगळ्या पथके बनवण्यात आली.
पहिल्या पथकाने ट्रॉली बॅगच्या सप्लाय चेनची तपासणी केली. पथकाने कोणत्या दुकानातून आणि कोणी ट्रॉली बॅग खरेदी केली, हे शोधून काढलं. दुसऱ्या पथकाने मृतदेहातून सापडलेले कपडे आणि दागिन्यांच्या मदतीने उत्पादक आणि दुकानदारांची चौकशी केली. याशिवाय, तिसऱ्या टीमने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये नोंदवलेल्या सुमारे 300 बेपत्ता आणि 70 अपहरणाच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली.
चौथ्या टीमने CCTV फुटेजची तपासणी केली. तसेच, मीडिया आणि सोशल मीडियाच्या मदतीने माहिती मिळवली. पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून मृत महिलेचं स्केच तयार केलं आणि तिची चौकशी करण्यात आली. दरम्यान, पाचव्या पथकाने मानवी गुप्त टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने पुरावे गोळा केले.
हे ही वाचा: तीन मेहुण्यांनी मिळून दाजीचे हात-पाय बांधले अन् कारच्या डिक्कीत... फिल्मी स्टाइलने केलं किडनॅप पण...
अखेर महिलेची ओळख पटली
या प्रयत्नानंतर महिलेची ओळख 23 वर्षीय फरीदा खातून अशी झाली असून ती उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी होती. फरीदा आणि तिचा पती जिया-उल-हक त्यांच्या दोन मुलांसह उदगीरमध्ये राहत होते. पण उदगीरला फरीदाचे एका दुसऱ्याच पुरूषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला, त्यानंतर आरोपी पतीने त्याच्या चार मित्रांसह त्याच्या पत्नीची हत्या केली.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास सुरू आहे.